शिरूर : राजा छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या शासनमान्य जे. जे. इंटरनॅशनल स्कूल (CBSE) या शाळेने यंदाच्या २०२६ च्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने ‘विशेष प्राविण्य’ श्रेणीत उत्तीर्ण होत उत्कृष्ट गुणवत्ता सिद्ध केली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची झळाळती कामगिरीया परीक्षेत रिशिका उमेश पावसे हिने ९६% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तनिष्का किरण मांजरे हिने ९४% गुणांसह द्वितीय स्थान मिळवले, तर नीरज त्र्यंबक टाकळकर आणि राजवी राहुल डुकरे यांनी प्रत्येकी ९३% गुण मिळवत तृतीय क्रमांकावर आपली छाप उमटवली आहे.
माहिती तंत्रज्ञान (IT) विषयातही शाळेने उल्लेखनीय यश मिळवले आहे. तनिष्का किरण मांजरे आणि रिशिका उमेश पावसे यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत परफेक्ट स्कोअर साध्य केला, ज्यामुळे शाळेच्या गुणवत्तेत आणखी भर पडली आहे.
या यशाबद्दल समाधान व्यक्त करत शाळेचे संस्थापक शंकर जांभळकर यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे.तसेच, संस्थेचे अध्यक्ष शंकर जांभळकर, उपाध्यक्ष दिलीप ढोकले, सचिव दिव्या जांभळकर, प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर, समन्वयिका सुनीता फुके आणि सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.या यशामुळे परिसरात शाळेच्या कार्याची पुन्हा एकदा दखल घेतली जात असून, सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.











Add Comment