ताज्या घडामोडी प महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र शिरूर

दशक्रिया विधीत घालून दिला अनोखा आदर्श!

शिरूर : अंत्यसंस्कार, दशक्रिया, श्रद्धांजली सभा या प्रसंगांना राजकीय नेत्यांची उपस्थिती अपरिहार्य झाली आहे. जनतेशी जोडलेपण दाखवण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी नेते मंडळी शोकसभेत गर्दी करतात. त्याठिकाणी सुरू होतो भाषणांचा वर्षाव. मात्र पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव गणपती येथे या सर्व प्रथा मोडून एक आदर्श घालून देण्याचा प्रसंग एका दशक्रिया विधीमध्ये घडला आहे.

दशक्रिया विधीच्या ठिकाणी शोक, मौन आणि आत्मपरीक्षण यांचे वातावरण असायला हवे, तिथे आता टाळ्यांचा गडगडाट, घोषणाबाजी आणि राजकीय भाषणांचा ओघ दिसू लागला आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे मंगळावर ( दि.२७/०५/२०२६) रोजी कै. श्री. संपत श्रीपती लांडे यांच्या दशक्रिया विधीच्या प्रसंगी मोठा जनसमुदाय लोटला होता. कीर्तनकार हभप ऋषिकेश चोरगे यांचे प्रवचन संपल्यानंतर सर्वांनी नेहमीप्रमाणे शोकसभा होऊन पसायदानाने सांगता केली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र लांडे कुटुंबीयांनी एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचे स्वागत उपस्थित यांच्याकडून करण्यात आले.

लांडे कुटुंबियांच्या वतीने जावई संदीप सुदाम कुटे यांनी दशक्रियेसाठी आलेल्या पाहुणे आणि मान्यवरांचे ऋण व्यक्त केले. तसेच कुटे यांनी हभप चोरगे यांना पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करावी अशी विनंती केली. रांजणगाव गणपती येथील दशक्रिया विधीमध्ये एकही शोकाकुल भाषण अथवा भावना व्यक्त न करता थेट लांडे कुटुंबीयांनी ऋण व्यक्त करून दुःखद वातावरणात सामाजिक बदल घडवण्याचे काम केल्याने शिरूर तालुक्यातून त्यांच्यावर कौतुक केलं जात आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्रात देखील भाषणांवर प्रतिबंधक घालून एक वेगळा आदर्श घालावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Featured

error: Copying content is not allowed!!!