शिरूर

ब्रेकिंग न्यूज | शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला मोठा धक्का!

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे. मतदार यादी बेकायदेशीर ठरवत उच्च न्यायालयाने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून ती नव्याने राबविण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने पात्र मतदारांची यादी तयार करण्यात येणार असून, त्यानंतर संपूर्ण निवडणूक कार्यक्रम पुन्हा जाहीर करून मतदानाची प्रक्रिया नव्याने पार पाडली जाईल.
या निर्णयामुळे निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संबंधित उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची विद्यमान निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून, आता सर्वांचे लक्ष नव्या निवडणूक कार्यक्रमाकडे लागले आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!