कोकण

राज्यात पावसामुळे हाहाकार मृतांचा आकडा 164 पार

मुंबई – महाराष्ट्रात कोकणातील रायगड जिल्ह्यात 11 आणि विदर्भ,वर्धा आणि अकोला जिल्ह्यात प्रत्येकी दोन मृतदेह आणि पूर आणि भूस्खलनाने बाधित झालेल्या राज्यात मृतांचा आकडा 164 वर आला आहे.तर 100 जण अद्याप बेपत्ता आहेत. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साताऱ्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील पूर परिस्थितीचा आढावा घेतला.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहिती नुसार आतापर्यंत 2,29,074 लोकांना बाधित क्षेत्रातून बाहेर काढण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात 95,साताऱ्यात 45,रत्नागिरीमध्ये 21,कोल्हापुरात 7, ठाण्यात 12,मुंबईत 4 आणि सिंधुदुर्ग, पुणे,वर्धा आणि अकोला येथे प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला.याशिवाय मुसळधार पावसात विविध अपघातात 56 जण जखमी झाले आहेत.रायगडमध्ये 34, मुंबई आणि रत्नागिरीतील प्रत्येकी सात,ठाण्यात सहा आणि सिंधुदुर्गमधील दोन जण जखमी झाले.

रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील भागाचा दौरा केला. सोमवारी त्यांनी सातार्‍यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोमवारी सांगली जिल्ह्यातील अनेक पावसाने बाधित गावांना भेट दिली आणि पूरग्रस्तांना भेटण्यासाठी नावेतून काही भागात पोहोचले. पवार यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. दरवर्षी पूरग्रस्तांना ज्या भागांचा त्रास होतो त्या क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले जेणेकरून त्यांचे पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करता येईल.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!