कोकण ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची तातडीची मदत.

मुंबई – राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत त्यातून सावरण्यासाठी राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी तातडीची ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे आहे.

दुरुस्ती व दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटीस मान्यता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी ही तातडीची मदत दिली जाणार आहे तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले आहे.
एनडीआरएफच्या निकषानुसार ही मदत दिली जाणार आहे यामध्ये प्रत्येक कुटुंबाला दहा हजारांची सानुग्र मदत आणि संपूर्ण घर पडलेल्या कुटुंबांना दीड लाखाची मदत केली जाणार आहे तर दुकानाच्या नुकसानीसाठी पन्नास हजार रुपये तर टपरिसाठी पंधरा हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

दरम्यान भाजपच्या नेत्यांनी यापूर्वी महाविकास आघाडी सरकारवर मदत जाहीर करत नसल्याने जोरदार टीका केली होती मात्र आता राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या मदतसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

error: Copying content is not allowed!!!