क्राईम

पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील ‘या’ आरोपींना केले जेरबंद !

कारेगाव :- बाभुळसर खुर्द (ता.शिरुर,जि. पुणे) येथील देवकर आणि वाळके कुटुंबियांनी एकमेकांना केलेली मारहाणीतील आरोपींना मोठ्या शिताफीने रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक केली आहे.यातील पंडित एकनाथ देवकर (वय 28 वर्ष), निलेश तुकाराम वाळके (वय 30 वर्ष),शुभम ज्ञानदेव खोडदे (वय 21 वर्ष),रामदास संतू देवकर ( वय 36 वर्ष ) या चार आरोपींना रांजणगाव पोलिसांनी सिंहगड येथील परिसरातून अटक करण्यात आले आहे.

दि. 22/7/2021 रोजी कारेगाव ते बाभूळसर गावच्या रोडवर रंगनाथ केरबा वाळके(वय.५१,रा. बाभूळसर खुर्द,ता.शिरुर,जि. पुणे) हे कारेगाव येथे दूध टाकून परत घरी जात असताना पंडित देवकर,निलेश वाळके,लक्ष्मण देवकर,भरत देवकर,शुभम खोडदे,रामभाऊ संतू देवकर (सर्व रा बाभूळसर खुर्द ता शिरूर जि पुणे ) व त्यांच्या सोबतचे अनोळखी 4 ते 5 व्यक्तींच्या टोळक्याने येऊन बेदम मारहाण करीत हाथ व पाय असे फ्रॅक्चर करण्यात आले होते.तसेच पंडित देवकर व लक्ष्मण देवकर यांनी ‘तुझ्या घरातील सगळ्यांना संपऊन टाकतो, तुला आत्ताच संपवतो’ असे म्हणून जीवे ठार मारण्याचे उद्देशाने फिर्यादी यांचे डोक्यावर, हातावर, पायावर मारहाण करून गंभीर जखमी केले असून पुढील उपचार करण्यासाठी रांजणगाव येथील अथर्व हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येळे, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल हुडे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस नाईक राजेश ढगे,व सायबर शाखा पुणे ग्रामीण यांनी केली.

पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येळे करत आहेत

Featured

error: Copying content is not allowed!!!