शिरूर : रांजणगांव गणपती येथे अमली पदार्थ विरोधी कारवाईत पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांच्या पथकाने रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत राहत्या घरावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एका तरुणाला अटक करण्यात आले असून त्याच्याकडून आणखी अमली पदार्थ व गुटखा साठवला आहे का याचा तपास पोलिस करत आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांच्या पथकाने रांजणगाव पोलीस स्टेशन मिळून संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सायंकाळीच्या सुमारास रांजणगाव गणपती येथील सरकारी रुग्णालयाजवळ, रांजणगाव–करंजावणे रस्त्यालगत असलेल्या आरोपी विपुल संदीप विटकर (वय 20, रा. रांजणगाव गणपती) कडे अमली पदार्थ असल्याचे पोलिसांना समजले. आरोपी विटकर याच्या राहत्या घरात पोलिसांनी छापा टाकला असता त्यात तब्बल 200 किलो अमली पदार्थ व गुटखा मिळून आला. पोलिस हवालदार तुषार अशोक पंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यात गांजा मिश्रित गोळ्यांचे विविध पॅकेट्स, प्लास्टिक गोण्या व बॉक्स असा मोठा साठा आढळून आला. यासोबतच प्रतिबंधित गुटखा देखील जप्त करण्यात आला आहे. जप्त मालाची एकूण अंदाजे किंमत 57,350 रुपये इतकी आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस हवालदार अभिमान कोळेकर यांनी दाखल केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा अधिक तपास रांजणगाव पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.











Add Comment