खेड ताज्या घडामोडी

शेलपिंपळगाव भागातील कोरोनामुळे ही गावं बंद

शेलपिंपळगाव – गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. पुणे जिल्ह्यातील काही गावांना आणखी कोरोनाच्या विळख्याने वेढा दिला आहे.

खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव आरोग्य केंद्राच्या अंतर्गत चिंचोशी, सिद्धेगव्हान व कोयाळी ही गावे आरोग्य विभागाच्या वतीने हॉट स्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी व प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात उपयोजना राबविण्यात येत आहे मात्र त्याला काही प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे.
दरम्यान आरोग्य केंद्राच्या हद्दीतील गावांमध्ये आज पर्यंत 50 टक्केपेक्षा अधिक लसीकरण करण्यात आले आहे. आज पर्यंत 19 गावातील 2987 कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहे. 92 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू कोरोनाने झाला आहे तर 2856 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे…

आज शेलपिंपळगाव आरोग्य केंद्राच्या परिक्षेत्रात एकूण 39 रुग्ण बाधित आहे. यामध्ये चिंचोशी 18, सिद्धेगव्हान 10, कोयाळी 02, शेलपिंपळगाव 04, काळूस 03 व चऱ्होली खुर्द, धानोरे प्रत्येकी 1 असा बाधित रुग्णांचा आकडा आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांवर आरोग्य विभागाच्या वतीने बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
आरोग्य विभाच्या वतीने शेलपिंपळगाव आरोग्य केंद्रातील 19 गावातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गावात व उपकेंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जात आहे. आज पर्यंत 26 हजारांहून जास्त लसीकरण शेलपिंपळगाव आरोग्य केंद्रामार्फत केले आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अँटीजन टेस्ट वर भर देण्यात आला आहे पॉझिटिव्ह रुग्णांना तत्काळ कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. कोणालाही घरी उपचार करण्यास परवानगी दिली जात नाही असे शेलपिंपळगावच्या आरोग्य अधिकारी
इंदिरा पारखे यांनी सांगितले

चिंचोशी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दुकाने व व्यवसाय पुढील दहा दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहे. गावात लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी ग्रामपंचायतच्या मार्फत प्रयत्न केले जात आहेत, गावात आरोग्य उपकेंद्रे नसल्याने लसीकरण कमी होत आहे तरी गावात आरोग्य उपकेंद्र व्हावे अशी मागणी आम्ही करणार आहोत –
सौ उज्वला गोकुळे (सरपंच चिंचोशी)

गावातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असून मोठ्या प्रमाणात गावात लसीकरण केले जात आहे, पुढील दहा दिवस संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले असून कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी नागरिकांच्या प्रयत्नाला यश येताना दिसत आहे
– गणेश कोळेकर (सरपंच कोयाळी)

error: Copying content is not allowed!!!