पुणे : कोल्हापुर,चिपळूण,महाड तसेच रायगड भागात महापुर आणि भुस्खलन झाल्यामुळे गावच्या गावं उध्वस्त झाली. ती गावे पुन्हा वसविण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था राजकीय नेते या गावांना जीवनावश्यक साधन सामुग्रीसह वस्तु पुरवत आहेत.मात्र शिरूर-हवेली विधानसभेचे आमदार अशोक पवार यांनी पुरग्रस्त नागरीकांना मदत देताना त्या मदतकार्याचा इव्हेंटच केला आहे. ‘आमदार महोदय मदत देत आहेत की फोटोसेशन करत आहेत’ असा प्रश्न सोशल मिडियामध्ये नागरीकांकडुन उपस्थित केला जात आहे.
आमदार पवार यांनी पुरग्रस्तांना रावलक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत शिरूर – हवेली विधानसभा मतदारसंघातुन ट्रकच्या ट्रक भरून जीवनपयोगी साहित्य,वस्तु व किराणा पाठविण्यात आला. हे जरी कौतुकास्पद असले तरी ही मदत पुरग्रस्त भागातील नागरीकांपर्यंत पोहचविण्याकरता जे फोटोसेशन केले आहे,त्यामुळे ते सोशल मीडियावर अधिक चर्चेत आले आहेत. ही मदत करत असताना पवारांनी या मदतीचा इव्हेंट करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला कि काय असा प्रश्न अनेक नागरीक उपस्थित करत आहेत. ही मदत पाठवत असताना आमदार पवार यांनी आनंदाच्या भरात गाडीच्या सनरुफमधुन बाहेर येत हातात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा घेऊन फोटो सेशन केले हे योग्य आहे का ..? असाही प्रश्न उपस्थित होत आहे..
राज्यातील निवडणूका तर आत्ताच झाल्या मात्र हे आमदार महोदय आलीशान गाडीच्या सनरूफमधुन बाहेर येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेऊन नेमका कोणत्या निवडणुकीचा प्रचार करत आहेत, अशा चर्चा सामान्य नागरिक करत आहेत.
आमदार महोदयांनी कोकणवासीयांना केलेली मदत नक्कीच कौतुकास्पद आहे. परंतु मदत करत असताना अशा प्रकारच्या स्टंटबाजीमुळे हे सर्व मदतीसाठी की फक्त स्वत:ला प्रकाशझोतात आणण्यासाठी अशा चर्चांना शिरुर हवेली मतदारसंघामध्ये उधान आले आहे. परंतु सर्व चर्चांमुळे आमदार अशोक पवार चांगलेच ट्रोल होत आहे.
Add Comment