आंबेगाव खेड जुन्नर ताज्या घडामोडी शिरूर

डॉ. कोल्हेंनी केला आढळरावांना फोन.

जुन्नर, पुणे – बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे यात कुठलाही पक्षभेद, वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय आड येता कामा नये. सर्वांनाच बरोबर घेऊन हा प्रश्न सोडवायचा अशी भूमिका शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्वतः कॉल करुन बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी नव्याने रणनिती आखण्यासाठीच्या आजच्या बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली. त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे त्यामुळे डॉ. कोल्हे यांचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

बैलगाडा शर्यत बंदी विरोधात सर्वांची एकजूट दिसली पाहिजे. त्यामुळे सर्वच पक्षातील आजी-माजी खासदार, आमदार, प्रमुख बैलगाडा मालक संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी यांची वज्रमूठ बांधून हा लढा द्यायचा हा मनोदय आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला सारून आवर्जून आढळरावांना कॉल करून आपलंही मार्गदर्शन व्हावं अशी विनंती केली. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आपली वेळ घेऊन आपल्याकडे चर्चेसाठी येतो असे सांगितले.

दरम्यान या कॉलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची बैलगाडा शर्यत विषयी असलेली आस्था समोर आली असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत. बैलगाडा शर्यती हा आपल्या दृष्टीने कुठल्याही श्रेयवादाचा विषय नसल्याने आपण पक्षभेद न बाळगता सामूहिक प्रयत्नांच्या दिशेने एक पाऊल टाकले असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

Featured

error: Copying content is not allowed!!!