जुन्नर प्रतिनिधी – ‘जुन्नर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला’, असं तालुक्यातील भाषणबाजीचं राजकीय समीकरण…! तालुक्याला एकदाच शिवसेनेचा आमदार मिळाला अन तो ही सेनेच्या अंतर्गत राजकारणाच्या धुळवडीमुळे नेस्तनाबूत झाला. तो ही या जखमी वाघीणीच्या कारवायांमुळे, म्हणतात ना ? “जे पेरलं तेच उगवत” याचा प्रत्यय पुन्हा काही कालावधी नंतर का होईना पाहवयास मिळाला.
मनसेचे माजी आमदाराच्या सेनेमध्ये पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील शिवसेनेच्या अंतर्गत लाथाळीला आणखीनच कहर आला. त्यामुळे सेनेच्या अंतर्गत राजकारणाला तालुक्यात मताधिक्य जादा असुन सुध्दा शिवसेनेचा आमदार का निवडुन येत नाही.? हा प्रश्न शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींना सारखा पडत होता. याच वाघिणीला तालुक्यात विधानसभा निवडणुका दरम्यान पराभव स्वीकारावा लागला होता. कारण सेनेतील “सूर्याजी पिसाळ” काही ना त्या कारणावरून बदफैली करून याच वाघिणीला निवडणुकीत पाडत होते. हे मात्र तितकेच खरे..!
यालाच विरोध करता करता जिने शिवसेनेला तालुक्यात खऱ्या अर्थाने रूजवली त्या वाघीणीला मात्र या कुरघोडीत राजकीय बळी बनावं लागल..!
त्या दरम्यान मुंबईतील मातोश्रींच्या दरवाजाचे उंबरठे झिजवले मात्र काही उपयोग झाला नाही, अन शेवटी हाकालपट्टीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. याच जखमी वाघिणीने मागील विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून मुंबईच्या वाघाला आपल्या मताधिक्याचा “नजराणा” बहाल केला.
पण तरीही याला दाद मिळत नसल्याने शेवटी तीने स्वबळाच्या नारा देत आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर भाजपा प्रवेश निश्चित केला आहे. आज गुरुवार (दि. १९) दुपारी हा पक्ष प्रवेश “मुंबापुरी” येथील भाजपा कार्यालयात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
मात्र या घटनाक्रमा बद्दल जुन्नर तालुक्याच्या राजकारणात घड्याळाचे काटे टिकटिक करत पुढे सरकणार की थांबणार ? हा प्रश्न उत्सुकतेचा आहे, तसेच शिवसेनेचा बाण हा आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा अडगळीत पडणार का ?. या विषयावर जुन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागातील पारावर गप्पा रंगल्या आहेत. पण एक निश्चित आहे जखमी वाघीण तालुक्यातील सहकार आणि इतर राजकारण हदरवुन सोडणार हे मात्र निश्चित पाहायला मिळणार.
Add Comment