मंचर – बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी बैलगाडा मालक आता आक्रमक झाले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या झरे गावात ज्या प्रमाणे गनिमीकावा करून बैलगाडा शर्यत घेतली, त्याचप्रमाणे आता शिरूर तालुक्यातही बैलगाडा शर्यत भरणार असल्याचे सूतोवाच विठ्ठलवाडीचे (ता.शिरूर) माजी उपसरपंच आणि पुणे जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे यांनी केले होते. त्यालाच प्रतिसाद देत पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्याच्या बैलगाडा मालकांच्या वतीने देखील शिरूर तालुक्यात होणार असलेल्या बैलगाडा शर्यतीला जाहीर पाठिंबा दिला आहे. आणि अशा शर्यती पुणे जिल्ह्यात इथून पुढे वारंवार होणार आहे, याची मुहूर्तमेढ जयेश शिंदे रोवणार असले तरी पुणे जिल्ह्यात याची पुनरावृत्ती वारंवार होणार आहे. असेही एरंडे यांनी सांगितले.
बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य ते मंत्री या सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे आणि त्याचे नेतृत्व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करावे त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते, बैलगाडा मालक राजकीय जोडे बाजूला ठेऊन वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडा शर्यतीसाठी एकत्र येण्यास तयार आहोत.
केवळ बैलगाडा मालकांवरील गुन्हे दाखल झालेले मागे घेण्याची घोषणा न करता त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. असेही मत एरंडे यांनी व्यक्त केले. तर या दरम्यान जयेश शिंदे यांनी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी देखील पाठिंबा दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. तर देशमुख यांनी आमदार पडळकर यांचे बैलगाडा शर्यती संदर्भात आवाज उठवल्याने आभार मानले आहे. तर गृहमंत्री वळसे पाटील यांनी बैलगाडा मालकांवरचे दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिल्याने आभार मानले आहे.
दरम्यान शिरूर तालुक्यात भरावणार असलेल्या बैलगाडा शर्यतीला आंबेगाव तालुक्याचाही पाठिंबा आहे. शिरूर – आंबेगाव हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मतदार संघ आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे आणि जयेश शिंदे यांना आमदार पडळकरांच्या मिळालेल्या सूचनेनुसार गृहामंत्र्यांच्या मतदार संघात बैलगाडा शर्यती होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Add Comment