ताज्या घडामोडी पुणे शिरूर

भाजपच्या आंदोलनाला बैलगाडा मालकांनी फिरवली पाठ…!

शिरूर, पुणे | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला गुंगारा देत सांगलीच्या झरे गावात बैलगाडा शर्यती भरवल्या तर इकडे शिरूर तहसिल कार्यालयावर भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी बैलांसह मोर्चा काढला. परंतु झरे गावात राज्याच्या कानाकोपऱ्यातुन बैलगाडा मालक बैलांसह हजर राहिले त्यानंतर भाजपचा हा केवळ स्टंट होता अशा प्रकारच्या राज्यभर प्रतिक्रिया उमटल्या.

त्याच प्रकारे दोन दिवसांपूर्वी तहसिल कार्यालयावर भाजपच्या जयेश शिंदे यांनी काढलेल्या मोर्चामध्ये बैलगाडा मालकांनी पाठ फिरवलेली पहायला मिळाली. संरक्षित यादीतून बैलाला वगळल्याशिवाय बैलगाडा शर्यत सुरू होणार नाही असं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. केंद्र सरकारने या बैलाला संरक्षित यादीतून वगळावे यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रयत्न करत आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आहे, तर भाजपच इकडे आंदोलन करून बैलगाडा मालकांची दिशाभूल करत आहे का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

शिरूर तहसिल कार्यालयावर काढलेल्या बैलगाडा मोर्चात बैलगाडा मालक कमी भाजपचे कार्यकर्तेच जास्त पाहायला मिळाले. त्यामुळे बैलगाडा मालकांची आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा उरली नाही की, भाजपचे आंदोलन फसवे होते, त्यामुळे बैलगाडा मालकांनी पाठ फिरवली हे अद्याप अस्पष्ट आहे.

error: Copying content is not allowed!!!