शिरूर, पुणे | शरद पवार साहेबांचे स्वीय सहायक ते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री हा संपूर्ण प्रवास थक्क करणारा असला तरी तो निर्विकार आणि निष्कलंक राजकारणी म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी आत्ता पर्यंत गाठला आहे.
शांत, सायमी म्हणून वळसे पाटील यांची राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात ओळख आहे. जेव्हा जेव्हा राज्य सरकार अडचणीत येतं तेव्हा तेव्हा सरकारच्या धुरा वळसे पाटील यांच्या हाती सोपविण्यात आल्या आणि त्यांनी देखील सरकारची प्रतिमा अबाधित ठेवली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा विचार केला तर अजित पवार, आर आर पाटील, जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील हे चौघेजण पक्षाचे प्रमुख आधारस्तंभ मानले जायचे. दुर्दैवाने, आर. आर. पाटील यांचं निधन झालं. अजित पवार हे शरद पवारांच्या शब्दाबाहेर जात नसले, तरी अनेकदा त्या दोघांमधल्या संबंधांमध्ये अस्वस्थता असल्याचंही समोर आलं आहे. अशापरिस्थितीत कोणतीही महत्त्वाची जबाबदारी द्यायची झाली तर त्यासाठी जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांचा विचार होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या सचिन वाझे प्रकरणात अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सरकारची प्रतिमा ढासळली त्यानंतर सरकारची प्रतिमा आणि योग्य व्यक्ती त्या पदावर असावा म्हणून शरद पवारांनी वळसे पाटील यांची निवड केली. यापूर्वी वळसे पाटील यांनी तब्बेतीचे कारण पुढे करत ती जबाबदारी झटकली होती मात्र यावेळी वळसे पाटील यांना ती स्वीकारावीच लागली.
विधानसभा अध्यक्षपद सांभाळल्यामुळे त्यांना कायदे आणि नियमांची संपूर्ण जाण आहे. ते मितभाषी आणि सय्यमी नेते आहेत. त्यांनी विवादास्पद वक्तव्यं केल्याचं फारसं कधी कोणी ऐकलं नाही. आणि त्यांच्यावरही कोणी जहरी टीका केल्याचे कोणी ऐकले नाही.
वळसे-पाटील यांच्या ऊर्जामंत्रिपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात तेव्हा लोडशेडिंगची समस्या खूप तीव्र होती. त्यांनी कृषी क्षेत्रात सिंगल फेजिंग योजना अंमलात आणली आणि लोडशेडिंगची समस्या बऱ्यापैकी आटोक्यात आणण्याचं काम त्यांनी केले होते. ते तंत्रशिक्षण मंत्री देखील होते त्यावेळी त्यांनी एमकेसीएलची स्थापना केली. गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ग्रहामंत्रालाय आणि राज्य सरकारची प्रतिमा अबाधित ठेवण्याचं काम वळसे पाटील यांनी योग्यरीत्या केले आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली होती. मात्र बहुमत नसल्याने फडणवीस यांनी राजीनामा दिला. आणि भाजपचा प्रयोग फसला होता त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि बहुमत सिद्द करण्याची वेळ आली आणि विरोधी गट देखील प्रबळ असल्याने पुन्हा अडचण निर्माण झाली होती. मग पुन्हा वळसे पाटील यांच्या हाती हंगामी विधानसभा अध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आणि महाविकास आघाडी अग्निपरिक्षेमध्ये पास झाली.
ज्या ज्या वेळी राज्य सरकारवर संकट आलं त्या त्या वेळी वळसे पाटील यांच्या हाती जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती पूर्ण केल्याने वळसे पाटील यांच्याबाबत नेहमीच सर्वांना आदर राहिला आहे. त्यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त The बातमी कडून खूप साऱ्या शुभेच्छा…..!
Add Comment