आंबेगाव ताज्या घडामोडी राजकीय शिरूर

तुम्ही गावात आल्यावर, आम्हाला वळसे पाटील आल्यासारखं वाटतं .

शिक्रापूर, पुणे | जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणखी दूर आहेत मात्र पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे आत्ताच वाहू लागले आहेत. रांजणगाव गणपती – कारेगाव जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार छोट्या छोट्या कार्यक्रमानिमित्त आत्ताच मतदारांपर्यंत पोहचत आहेत. अशातच शिरूर आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचूंदकर हे शिक्रापूर जवळील बुरुंजवाडी गावात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित होते. यावेळी पाचूंदकर शुभेच्छा देत असताना अचानक एका जेष्ठ नागरिकाने मधेच “मला एक बोलायचं आहे” असं सांगून पाचूंदकर यांना थांबवलं.

पाचूंदकर यांच्याकडे इशारा करत या जेष्ठ नागरिकाने “तुम्ही आमच्या गावात आलात की, आम्हा गावकऱ्यांना थेट वळसे पाटील आमच्या गावात आल्यासारखं वाटतं” अशी भावना व्यक्त केली त्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत या वाक्याला संमती दर्शविली. हे सगळं ऐकून घेत मानसिंग पाचूंदकर यांनी स्मित हास्य करत आपलं भाषण पुढे चालू ठेवलं

२००९ साली शिरूर तालुक्याचं दोन विधानसभा मतदार संघात विभाजन झालं शिरूरची ३९ गावं आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडली गेली. दरम्यान मानसिंग पाचूंदकर हे याच भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत आहेत. वळसे पाटील यांनी त्यांच्यावर ३९ गावच्या भागाचे अध्यक्ष पद सोपविले आहे. त्यामुळे मतदार संघात गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अनुपस्थितीत पक्षाची वाढ आणि वळसे पाटील यांची विकासकामे मतदार संघात पोहचविण्याचे ते सातत्याने काम करत असतात. वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दोन आठवड्यापूर्वी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून उच्चांकी रक्तदान करून घेण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. त्याचबरोबर वळसे पाटील यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून देखील पाचूंदकर यांची या भागात ओळख आहे.

त्यामुळे वळसे पाटील यांच्या गैरहजेरीत जरी मानसिंग पाचूंदकर यांनी कार्यक्रमांना हजेरी लावली तरी आम्हाला वळसे पाटीलच आमच्या गावात आल्यासारखं वाटत असल्याच्या भावना एका जेष्ठ नागरिकाने व्यक्त केल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

error: Copying content is not allowed!!!