क्राईम ताज्या घडामोडी शिरूर

शिरूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई.

शिरूर, पुणे | शिरूर वनविभागाच्या एक कर्मचाऱ्यासह एक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. तब्बल एक लाख रुपयांची रोकड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हस्तगत केली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक वनपाल आणि वनरक्षक यांच्याभोवती सापळा लावला होता आज (दि.18) वनविभागाच्या शिरूर येथील कार्यालयातच सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपायुक्त श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल क्षीरसागर यांच्या पथकाने थेट शिरूर वनविभागाच्या कार्यालयातच सापळा रचून एक लाख रुपयांच्या रोकडसह एक वनपाल आणि एक वनरक्षक यांना ताब्यात घेतले आहे.

लाकूड वाहून नेणाऱ्या दोन पिकअप गाड्या १ नोव्हेंबर रोजी वनविभागाने पकडल्या होत्या त्या सोडविण्यासाठी तक्रारदारकडे तब्बल लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. तब्बल एक लाख रुपयांची रोकड हस्तगत केल्यामुळे शिरूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

error: Copying content is not allowed!!!