क्राईम ताज्या घडामोडी पुणे

समाजकल्याण विभाग अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पडला नोटांचा पाऊस

पुणे |समाजकल्याण पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चक्क नोटांचा पाऊस पडल्याची घटना आज घडली आहे

पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे अधिकारी प्रवीण कोरंटीवार यांच्याकडे असलेल्या दलित वस्ती संदर्भातील काम मंजूर करून घेण्यासाठी शिरूर येथील एक गृहस्थ आले होते. त्यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. मात्र ती लाच अधिकारी प्रवीण कोरंटीवार यांनी नाकारली त्यानंतर काही वेळाने कार्यालयात नोटा पाहायला मिळाल्या.

दरम्यान हे पैसे नाकारत समाजकल्याण अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला. पैसे घेऊन आलेल्या व्यक्तीने त्या ठिकाणी पैसे फेकले असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे.

जिल्हा परिषदेच्या वर्तुळात या प्रकरणाची एकच चर्चा सुरू आहे. यासंदर्भात कोरंटीवार यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले, दलित वस्तीचे काम मंजूर करून घेण्यासाठी एक व्यक्ती सकाळी माझ्या कार्यालयमध्ये आला. त्यांनी मला लाज देण्याचा प्रयत्न केला. आपण तुझे काम करून देतो तुम्ही जावा असा सल्ला मी त्यांना दिला. मात्र त्या व्यक्तीने माझ्या कार्यालयात नोटा फेकल्या. नोटा घेऊन आलेल्या व्यक्तीवर आता काय कारवाई होणार याकडे संपूर्ण प्रशासनाचे लक्ष लागले आहे. लाच देणारी व्यक्ती ही शिरूर तालुक्यातील असल्याचे समजते.

error: Copying content is not allowed!!!