ताज्या घडामोडी राजकीय शिरूर

जातेगावची बरोबरी केंदूर, पाबळसह कोणीही करू नका- मानसिंग पाचूंदकर.

पाबळ, पुणे | रांजणगाव गणपती (ता. शिरूर) नंतर आता पाबळला देखील मोठ्या प्रमाणात क्रिकेटच्या स्पर्धा भरविण्यात आल्या आहे, या स्पर्धांचे नियोजन जिल्हा परिषद सदस्या सविता बागाटे यांनी केले आहे. या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात राजकीय फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळी माजी सभापती सुभाष उमाप यांनी त्यांच्या भाषणात त्यांचे जातेगाव बुद्रुक जरी लहान गाव असलं, तरी एका वर्षी तीन – तीन लोकनाट्य तमाशाचे कार्यक्रम भरविले होते, शिवाय मी व्यक्तिगत देखील एकदा गावात लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम घेतला होता. त्यामुळे मी मनात आणलं तर ते पूर्ण करू शकतो असे माजी सभापती शंकर जांभळकर यांना उद्देशून सुभाष उमाप यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला.

त्याचाच धागा पकडून पुढे राष्ट्रवादीच्या शिरूर आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचूंदकर यांनीही जोरदार फटकेबाजी करत एका वेळी तीन- तीन लोकनाट्य तमाशाचे कार्यक्रम आयोजित करणारे गाव कमी समजू नका केंदूर, पाबळ या मोठ्या गावांनी देखील बरोबरी करू नका. असं सांगण्याचा प्रयत्न सुभाष उमाप करत असल्याचा उल्लेख पाचूंदकर यांनी बोलताना केला. त्याचबरोबर यांच्याही बोलण्याचा रोक देखील जांभळकर यांच्याकडे होता. कारण येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जातेगाव बुद्रुकमधून माजी सभापती सुभाष उमाप हे तीव्र इच्छुक आहेत तर इकडे करंदीतून माजी सभापती शंकर जांभळकर हे देखील तीव्र इच्छुक आहेत. त्यामुळे पाबळ, केंदूरच्या खालोखाल मोठ्या मतदारांचे गाव करंदी हे आहे तर जातेगाव बुद्रुक कमी मतदार असलेले गाव आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत उमेदवारी मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे.

दरम्यान केंदूर विरुद्ध पाबळ हा क्रिकेटचा सामना सुरू होता या सामन्याचा आनंद लुटताना हे राजकीय सामने सुरु होते. तर केंदूर आणि पाबळ ही दोन गावं मोठ्या मतदारांची असल्याने नेहमीच राजकीय सामने खेळतात आणि उमेदवारीची वाटाघाटी करून गटात वर्चस्व ठेवतात मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदरच करंदी आणि जातेगाव बुद्रुक या गावांचे उमेदवारी मिळवण्यासाठीचे सामने पाहायला मिळत आहेत.
दरम्यान या क्रिकेटच्या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, सदाशिव पवार, प्रकाश पवार, विश्वास कोहकडे,सनी थिटे,भरत साकोरे हे देखील उपस्थित होते.

error: Copying content is not allowed!!!