शिरूर, पुणे | कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील कान्हूर मेसाई विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या २०२१- २०२६ पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री मेसाईदेवी सहकार पॅनेलचे १३ पैकी १२ संचालक विजयी झाले आहे, श्री मेसाईदेवी महाविकास आघाडी पॅनेलला मात्र एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
अत्यंत चुरशीची लढाई गावपातळीवरील कान्हूर मेसाईच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत पाहायला मिळाली. एकीकडे बबनराव शिंदे, सुधीर पुंडे, पंडित शिंदे, दीपक तळोले, बंडू पुंडे, शिवराम पुंडे, मोहन पुंडे, बाप्पूसाहेब ननवरे, मनोज शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल उभा केला, तर समोर महाविकास आघाडीच्या नावे दादा खर्डे, सोपान पुंडे, युनूस तांबोळी, संदीप तांबे यांनी तगडे आवाहन उभे केले होते. मात्र या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजय खेचून आणला. सुरुवातीला चाळीस वर्षे बिनविरोध होणारी विकास सोसायटी या घडीला देखील बिनविरोध होईल अशी अपेक्षा असताना दोन्ही गटांनी एकमेकांसमोर तगडे आवाहन उभे केल्याने अखेर दोन्ही गटांना निवडणूकिला सामोरे जावे लागले.
राष्ट्रवादीच्या बाजूने १३ पैकी तब्बल १२ उमेदवार विजयी ठरले. महाविकास आघाडीच्या पॅनेलला मात्र केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. या लढतीत संतोष शिंदे यांनी सर्वात जास्त मते मिळवून विक्रम केला तर त्या खालोखाल दादासो पुंडे, संजय पुंडे भास्कर पुंडे यांनी सर्वाधिक मते मिळवली. तर महाविकास आघाडीच्या फक्कड पुंडे या एकमेव उमेदवाराचा विजय झाला.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या पॅनलकडून सर्वच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.फक्कडराव पुंडे यांचे पुतणे भास्कर पुंडे तर दुसरे माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. भाऊसाहेब शिंदे यांचेही पुतणे संतोष शिंदे यांचा विजय या निवडणुकीत विशेष मानला जात आहे.
Add Comment