आंबेगाव खेड ताज्या घडामोडी राजकीय शिरूर

जिल्हाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनी दबाव आणून शर्यती स्थगित केल्या – आढळराव पाटील.

मंचर, पुणे | सर्वोच्च न्यायालयाने अटी शर्ती घालून बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली. त्याअनुषंगाने मावळ तालुक्यात आणि आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गावात बैलगाडा शर्यती १ जानेवारी भरविण्यात आल्या होत्या मात्र जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण देत शर्यतींना स्थगिती दिली. ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा याबाबत आदेश काढला. त्यामुळे बैलगाडा मालक तसेच माजी खासदार आढळराव पाटील यांनी या स्थगितीबाबत संशय व्यक्त केला आहे.

गेल्या आठ – दहा दिवसांपासून लांडेवाडीत बैलगाडा शर्यतीची तयारी जोरात सुरु होती. लांडेवाडी बैलगाडा शर्यतींचे प्रसिद्धी केंद्र होऊ लागले होते हेच काही लोकांच्या डोळ्यात खुपलं आणि त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत बैलगाडा मालक आणि आयोजकांवर अन्यायकारक स्थगितीचा आदेश काढण्यात आला. असे मत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या पुणे जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून बैलगाडा शर्यतींना स्थगिती आणली.

The बातमीशी बोलताना माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, “मी बातम्यांमध्ये पाहिलं दिलीप वळसे पाटील सांगत आहेत की, मुख्यमंत्रींचा आदेश होता मात्र मुख्यमंत्र्यांनी असा काहीही आदेश दिला नव्हता. महाराष्ट्रात सगळं चालू ठेवा आणि लांडेवाडीची शर्यत बंद ठेवा असं कधीही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नव्हतं. फक्त लांडेवाडीची बैलगाडा शर्यत बंद पडली बाकी सर्व चालू होतं. त्यामुळे हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांचा होता”. आणि जिल्हाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनी दबाव आणला म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे आढळराव यांनी सांगितले.

बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागातील अर्थकारण अवलंबून असते याची उदाहरणे देत अनेक नेत्यांनी बैलगाडा शर्यतीप्रती पोकळ सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला, प्रत्यक्षात मात्र छोट्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर लाथ मारण्याचं काम याच नेत्यांनी केले असल्याच्या भावना अनेक बैलगाडा मालकांनी व्यक्त केल्या. बैलगाडा शर्यतीचा केवळ आपल्या स्वार्थी राजकारणासाठी वापर करणाऱ्या नेत्यांनीच बैलगाडा शर्यतीला स्थगिती आणली की काय असा सवाल आता बैलगाडा मालक करत आहेत.

1 Comment

Click here to post a comment

  • अरे लोकहो आता तरी सुधरा,विचार करुन मतदान करा, १० लाख जनता जमली तेथे कोरोना नव्हता का? शेतकरी राजा ही तुझी मुस्कटदाबी चालु आहे समजुन घे आणि लवकर जागा हो

error: Copying content is not allowed!!!