ताज्या घडामोडी राजकीय शिरूर

शिरूरच्या ३९ गावांतील शिवसैनिक ऍक्शनमोडमध्ये, मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा…?

शिक्रापूर, पुणे | महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीजबिल भरणा सक्ती करूत ट्रान्सफॉर्मर बंद करून नाहक त्रास दिला जातोय त्याचबरोबर योग्य सुविधा देखील पुरवल्या जात नसल्याने शिरूरच्या ३९ गावांतील शिवसैनिकांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. त्यामुळे शिरूरच्या ३९ गावांतील शिवसैनिक आता ऍक्शनमोडमध्ये आल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री पदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना, मात्र शिरूर -आंबेगाव विधानसभा मतदार संघातील शिरूरच्या ३९ गावांतील शिवसैनिक शेतकऱ्यांची बाजू घेऊन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेत शेतकऱ्यांना होणाऱ्या नाहक त्रासाचा पाढा वाचला आहे. शिवसेना संपर्कप्रमुख विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाधान डोके, रविंद्र गायकवाड, कांताराम नप्ते, नितीन दरेकर, वैभव ढोकले, राघु नप्ते, हेमंत निलख या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. यामध्ये विविध गावातील ट्रान्सफॉर्मरच्या फ्युज पासून केबल जिथे खराब झाली आहे ती बदलून देणे, लोंबणाऱ्या विद्युत वाहिनीच्या तारा दुरुस्त करणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, ज्या शेतकऱ्यांना 5HP विजपंप आहे परंतु वीजबिल मात्र 10HP च्या पंपाचे मिळत आहे ते तात्काळ दुरुस्ती करणे, शून्य ते तीन विद्युत खांब पर्यंत तात्काळ विजजोड करून देणे अशा अनेक समस्यांचा पाढा यावेळी शिवसैनिकांनी वाचला त्यानंतर कार्यकारी अभियंता येडके यांनी या समस्यांवर तात्काळ कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले त्याचबरोबर वीजबिल भरून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील केले.

दरम्यान शेतकऱ्यांच्या या समस्या घेऊन शिवसैनिकांनी थेट केडगाव येथील महावितरण विभागाचे कार्यालय गाठून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक भूमिका घेतल्याने परिसरातून शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. त्याचबरोबर शिरूरच्या ३९ गावातील शिवसेना आता ऍक्शनमोडमध्ये आली आहे. आम्ही महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख घटक असलो तरी शेतकऱ्यांची बाजू पोटतिडकीने मांडणार आहोत. जनतेत जाऊन समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यामुळे या कामाला आणखी बळ यावे यासाठी ३९ गावांतील तीनही जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित करून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य देखील शिवसेनेचा निवडून आणणार असल्याचे जिल्हा उपप्रमुख रविंद्र गायकवाड यांनी सांगितले.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!