पुणे महाराष्ट्र

अभिनेता प्रसाद ओक का झाला भावुक…?

दिग्दर्शन, गायक, अभिनेता, सुत्रसंचालक अशा वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून आपली छाप सोडनारा प्रसाद ओक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची संपर्कात असतो. ओकने पत्नी मंजिरी साठी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर लिहिली आहे. त्याच्या या पोस्टनंतर मंजिरीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अभिनेते प्रसाद ओकची बायको मंजिरी ओक ही एक व्यावसायिक आहेत. सोशल मिडीयावर विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करून मंजिरी छोट्या उद्योजकांना मदत करताना दिसते. तिच्या याच कामामुळे तिला एक मोठा गौरव प्राप्त झाला आहे. कारण एका नथीला मंजिरी ओकचे नाव मिळाले आहे. ही नथ आता ‘मंजिरी नथ’ म्हणून ओळखली जाणार आहे. प्रसाद ओकने याची माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी आपल्या पाठीमागे तुझी चेष्टा केली… तुझ्या so called जवळच्या मैत्रिणींपैकी एकीनेही तुझं कधीही कौतुक केलं नाही. पण या सगळ्या गोष्टींना मागे टाकत….सगळ्यांच्या नाकावर टिच्चून तू आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते आहेस याचा खूप अभिमान वाटतोय. खूप खूप खूप प्रेम ❤️❤️❤️❤️❤️ ..!!#love #proud #proudhusband #keepitup #फालतूलोकांकडेदुर्लक्षचकर #godblessyou…

अशी काहीशी त्याने पोस्ट लिहिली आहे. यावर अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटीनी कमेंट करत या निरपेक्ष हेतूंचं फळ मिळाल्याबद्दल मंजिरीचे अभिनंदन केले आहे.

error: Copying content is not allowed!!!