शिरूर, पुणे | सात वर्षांच्या प्रतिक्षेतनंतर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच कात्रज डेअरीच्या संचालक मंडळाची निवडणूक 20 मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी 14 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या केशरताई पवार यांना संधी देण्यात आली आहे. तशी अधिकृत घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिरूर येथील एका कार्यक्रमात केली.
महाराष्ट्र सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद सोबले यांची नियुक्ती केली. सोबले यांनी सहकारी निवडणूक प्राधिकरणाला सादर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिल्याचे पत्र प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिले आहे.
संघाच्या संचालक पदाच्या 16 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड ,शिरूर ,मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर आणि दौंड या अकरा तालुक्यांसाठी दूध उत्पादक सोसायटी यांचा प्रत्येकी एका गटातून एक संचालक निवडला जाईल. महिला संचालकासाठी दोन जागा आहे. दरम्यान अ वर्गातील उमेदवारीच्या जागेवर पुन्हा एकदा पूर्वीच्याच संचालिका केशरताई पवार यांना निवडणूकीच्या रिंगणात पुन्हा संधी देण्यात येत आहे, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती आणि इतर मागास वर्गासाठी प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होईल
Add Comment