क्राईम ताज्या घडामोडी पुणे राजकीय

गुंड गजानन मारणेंच्या पत्नीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.

पुणे| पुणे शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्तेची आगामी गणिते लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर सुरू केले आहे. सर्वाधिक इनकमिंग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुरू असून आज कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या पत्नी आणि मनसेच्या माजी नगरसेविका सौ. जयश्री गजानन मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष या नात्याने प्रशांत जगताप यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर ददिपक मानकर, नगरसेवक श्री. बाबुराव चांदेरे, मा. नगरसेवक बंडूभाऊ केमसे, नगरसेवक  सुभाष जगताप, रुपाली ठोंबरे व अभय मांढरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार व आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या विचारांवर निष्ठा दाखवून जायश्री राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात दाखल झाल्या आहेत. येत्या काळात शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील.” असे सूचक विधान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले असले तरी गेल्या काही दिवसात सत्ताधारी भाजपा गुंड प्रवृत्ती असणाऱ्या लोकांना पक्षात प्रवेश दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने निशाणा साधत टीका केली होती मात्र आता तुरुंगात असणाऱ्या गजानन मारणे यांच्याच पत्नीला प्रवेश देऊन भाजपला टीका करण्यास संधीच दिल्याचे दिसून येत आहे…

error: Copying content is not allowed!!!