राजकीय शिरूर

करंदी सोसायटीच्या निवडणुकीतही जांभळकरांचाच करिष्मा कायम…!

शिरूर, पुणे | ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणेच गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका देखील स्थानिक राजकारणाच्या दिशा बदलू लागल्या आहेत. ग्रामपंचायतप्रमाणे सोसायटीच्या निवडणुकांना देखील महत्त्व प्राप्त झाले आहे. करंदी (ता. शिरूर) येथील करंदी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या बाराही उमेदवारांनी विजयश्री खेचून आणल्याने ग्रामपंचायतच्या निवडणुकीप्रमाणेच सोसायटीच्या निवडणुकीतही जांभळकरांचा करिष्मा चालला आहे.

ढोकले कुटुंबियांच्या एकजुटीचे दर्शन

करंदी गावच्या मतदार यादीत ढोकले परिवाराचा आकडा मोठा असल्याने ग्रामपंचायतच्या निवडणुकीतही ढोकले कुटुंबियांची एकजूट सिद्द झाली, त्याचप्रमाणे सोसायटीच्या निवडणुकीतही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे. मात्र ढोकले आडनाव असलेल्या आठ उमेदवारांपैकी विजयी करंदी सहकार पॅनेलच्या खंडू शिवाजी ढोकले यांनी चौथ्या क्रमांकाची मते मिळवली तर, गावात कंद्रुप परिवाराचे सर्वात कमी मतदार असलेल्या बाबाजी कंद्रुप यांनी पहिल्या क्रमांकाची व ज्ञानेश्वर दरेकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची आणि लक्ष्मण झेंडे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवून विजय मिळवला आहे.

करंदी सहकार पॅनेलने बारा जागेवर आपले उमेदवार उभे केले होते यापैकी बाराही जागेवर करंदी ग्रामविकास पॅनेलने बाजी मारली आहे. विजयी झालेल्या करंदी सहकार पॅनेलचे नेतृत्व शंकर जांभळकर, सुहास ढोकले, राजेंद्र ढोकले, गोरक्ष ढोकले, बबलू ढोकले, कैलास नप्ते, यांनी केले. त्यांच्यासमोर स्वाभिमानी शेतकरी पॅनेलने केवळ पाच उमेदवारांच्या जोरावर तगडे आवाहन निर्माण केले होते. गेल्या सत्तावीस वर्षानंतर पहिल्यांदाच करंदी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक पार पडली. यामध्ये करंदी सहकार पॅनेलच्या बाळासाहेब खेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी पॅनेलच्या प्रदीप खेडकर यांच्यात ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली अवघ्या पंधरा मतांनी इतर मागास प्रवर्गातील नवख्या असलेल्या प्रदीप खेडकर यांचा पराभव झाला. यामध्ये विशेष म्हणजे ७७ मते बाद झाली. स्वाभिमानी शेतकरी पॅनेलचे नेतृत्व विकास दरेकर, अविनाश साकोरे, नितीन दरेकर, कांताराम नप्ते, नवनाथ ढोकले, वैभव ढोकले यांनी केले.

उमेदवार आणि मिळालेली मते

सर्वसाधारण कर्जदार खातेदार उमेदवार
१) बाबाजी कंद्रुप – ७५४ विजयी
२) ज्ञानेश्वर दरेकर – ६८९ विजयी
३) लक्ष्मण झेंडे – ६७० विजयी
४) खंडू ढोकले – ६६९ विजयी
५) पोपट नप्ते – ६४१ विजयी
६) शरद ढोकले – ६११ विजयी
७) मोहन ढोकले – ५९६ विजयी
८) सुभाष ढोकले – ५४२ विजयी
९) बाळासाहेब ढोकले – ४४३ पराभूत
१०) भाऊसाहेब ढोकले – ३९९ पराभूत
११) संतोष दरेकर – ३४८ पराभूत
१२) राजेंद्र ढोकले – १४२ पराभूत

इतर मागास प्रवर्ग
१) बाळासाहेब खेडकर – ४८१ विजयी
२) प्रदीप खेडकर – ४६६ पराभूत

महिला प्रतिनिधी
१) सविता नप्ते – ७०५ विजयी
२) अलका दरेकर – ६९१ विजयी
३) रंजना ढोकले – १७९ पराभूत
४) सविता पऱ्हाड – १५३ पराभूत

अनुसूचित जाती, जमाती प्रतिनिधी
१) विलास पंचमुख – ५५५ विजयी
२) शांताराम सोनवणे – ३९५ पराभूत

error: Copying content is not allowed!!!