राजकीय शिरूर

केंदूरच्या आबासाहेबांना राज्यात पक्षवाढीची जबाबदारी…!

शिरूर, पुणे | निष्ठवंत कार्यकर्त्यांना पक्ष योग्य वेळी न्याय देतो अशा चर्चा आपण केवळ ऐकल्या असतीलच परंतु केंदूरच्या (ता. शिरूर) आबासाहेब पऱ्हाड यांना अशाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निष्ठवंत कार्यकर्ता म्हणून राज्यात पक्षवाढीची जबाबदारी सोपविली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदी पऱ्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अचानक मिळालेल्या या संधीमुळे पऱ्हाड यांनी आनंद व्यक्त केला.

पक्ष स्थापनेपासून शरद पवार साहेबांच्या विचारांची शिदोरी घेऊन शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांसाठी व पक्षाच्या वाढीसाठी काम करत असल्याचे आबासाहेब पऱ्हाड यांनी निवडीनंतर सांगितले तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी त्यांना आपल्या टीममध्ये दाखल करून करून घेत संपूर्ण राज्यभर पक्षवाढीसाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

पऱ्हाड यांच्या वक्तृत्व शैलीचा फायदा पक्षाला नक्कीच होईल त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पऱ्हाड यांच्यावर विविध भागांतील सभांमध्ये पक्षाचे विचार पोहचविण्याची मोठी जबाबदारी पडू शकते. आबासाहेब पऱ्हाड हे शिरूर तालुक्यातील दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या केंदूर गावचे सुपुत्र आहेत. विद्यार्थी जीवनापासून तर राजकीय जीवनातील शरद पवार आणि माजी गृहराज्यमंत्री बाप्पूसाहेब थिटे यांची मैत्री सर्वश्रुत होती त्यामुळे केंदूरकरांची शरद पवारांवर निष्ठा कायम आहे त्यात आणखी भर म्हणून केंदूरच्या आबासाहेब पऱ्हाड यांना राज्यभर पक्षवाढीची जबाबदारी देण्यात आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. निवडीचे पत्र स्वीकारताना उद्योजक प्रमोद पऱ्हाड उपस्थित होते.

error: Copying content is not allowed!!!