शिरूर

संभाजी भिडेंची जीभ घसरली, शिरूर तालुक्यात वादग्रस्त वक्तव्य.

तिरंगा झेंड्याचा अपमान, मुस्लिम धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य

शिरूर, पुणे | सातत्याने वादग्रस्त वक्त्यांनी परिचित असलेले मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी पुन्हा शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप (वाजेवाडी) आणि मांडवगण फराटा परिसरातील निर्वि येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “काय आमचा तिरंगा झेंड्याशी संबंध, कुठला तिरंगा झेंडा? भगवा झेंडा टाकून हा तिरंगा झेंडा कोणी केला? कोण होता तो हरामखोर.?” अशा प्रकारचे वादग्रस्त विधान पिंपळे जागताप येथे केले तर निर्वि येथे माध्यमांशी बोलत असताना मुस्लिम धर्म हा हिंदुस्थानचा खरा शत्रू आहे असेही समाजात तेढ निर्माण करणारे विधान केले आहे.

वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समधीस्थळी बलिदानमास निमित्ताने दर्शन घेण्यासाठी आलेल्या संभाजी भिडे यांनी पिंपळे जगताप येथे मंगळवारी (दि. १५ मार्च) रोजी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना भारताच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंगी झेंड्याचा अपमान होईल अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे, याशिवाय शिवराळ भाषा वापरात मुस्लिम समाजबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. दरम्यान या कार्यक्रमाला काही महिला व युवती उपस्थित होत्या याचे कुठलेही भान न ठेवता मुस्लिम समाजबाबत शिवराळ भाषा वापरात दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार (दि. १६ मार्च ) रोजी देखील ‘आज संभाजी महाराज नाहीत, औरंगजेब नाही मात्र पाकिस्तान, बांगलादेश आणि गावोगावी असलेल्या मुसलमानांच्या रूपाने औरंगजेब आजही शिल्लक आहे, संभाजी महाराजांनी मरण पत्करले पण इस्लाम धर्म पत्करला नाही, इस्लाम धर्माच्या पोटतिडकीने औरंगजेबाने संभाजी महाराजांचे बलिदान केलं तो इस्लाम आपल्या देशाचा खरा शत्रू आहे. असेही वक्तव्य केले आहे.

error: Copying content is not allowed!!!