राजकीय शिरूर

निर्वीच्या सोसायटीवर आबासाहेब सोनवणेंचे निर्विवाद वर्चस्व…!

शिरूर, पुणे | शिरूर तालुक्यातील अनेक गावांतील विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झालेली पाहायला मिळाली. छोट्या छोट्या गावांमध्ये देखील बिनविरोध निवडणुका झाल्या नाहीत तर काही मोठ्या गावांमध्ये बिनविरोध निवडणूका पार पडल्या. यामध्ये निर्वी (ता. शिरूर) येथील सोसायटीची निवडणूक नामनिर्देशन अर्ज दाखल केलेल्या दिवसापासूनच चर्चेत आली होती. भारतीय जनता पक्षाचे शिरूर तालुका अध्यक्ष प्रदीप उर्फ आबासाहेब सोनवणे यांनी आपल्या विचारांचे तेरा उमेदवार रिंगणात उतरवले होते. तेरा पैकी तेरा उमेदवारांनी विजय मिळवला याहे. यापूर्वी देखील या सोसायटीवर आबासाहेब सोनवणे यांचे वर्चस्व होते. पुन्हा एकदा सोनवणे यांनी एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

निर्वी ग्रामपंचायतवर देखील आबासाहेब सोनवणे यांचे वर्चस्व आहे, तर गेल्या पंचवार्षिक सोसायटीच्या निवडणूकीत एक जागा वगळता सर्वच जागा सोनवणे यांच्या गटाने जिंकल्या होत्या. तर यावेळी सुरवातीलाच एक जागा बिनविरोध निवडून आली होती तर उर्वरित बारा जागा देखील सोनवणे यांच्या गटाने जिंकल्या आहेत. दरम्यान नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यापासून निवडणुकीपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या, त्यामुळे निर्वी सोसायटीची निवडणूक तालुक्यात चर्चेत आली होती. मात्र या निवडणुकीत भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी आपले पुन्हा नेतृत्व सिद्ध करत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे.

विजयी उमेदवार खालील प्रमाणे

सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी – कैलास सोनवणे, विनोद सोनवणे, बाप्पू सोनवणे, शरद सोनवणे, पोपट पवार, राजाराम सोनवणे, संपत सोनवणे, शिवाजी सोनवणे,
महिला प्रतिनिधी – सिंधू मानसिंग सोनवणे, सुरेखा बंडू सोनवणे
भटक्या विमुक्त जाती, जमाती प्रतिनिधी – बाबा कोळपे
अनुसूचित जाती, जमाती प्रतिनिधी – तुळशीराम कांबळे,
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी – संतोष लटांबळे (बिनविरोध)

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!