शिरूर, पुणे | ग्रामपंचायत निवडणूक आणि विविध कार्यकारी विकास सोसायटीची निवडणूक आता प्रतिष्ठेच्या होत आहेत. याच विकास सोसायटीच्या निवडणुकीत शिरूर तालुक्यातील अनेक दीग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीत मात्र युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पाहायला. मिळाला युवकांनी निवडणुकीत भाग घेऊन अनेक नेत्यांना घरी पाठवल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.
पिंपळे जगताप विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या निवडणुकीत युवकांनी पुढाकार घेऊन सोसायटीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. चेअरमन पदी निलेश फडतरे तर उद्योजक श्रीपाद जगताप यांच्या मातोश्री सरस्वती जगताप यांची व्हाईस चेअरमन पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे सोसायटीची निवडणूक देखील अटीतटीची पाहायला मिळाली.
सर्वसाधारण कर्जदार खातेदार मधून श्री धर्मनाथ सहकार परिवर्तन पॅनेलच्या रामचंद्र जगताप, निलेश जगताप, लक्ष्मण तांबे, धनंजय थिटे, शिवाजी वाडेकर, बाळासाहेब शेळके, संतोष सोंडेकर यांचा विजय झाला तर श्री धर्मनाथ ग्रामविकास सहकार परिवर्तन पॅनेलच्या एकमेव बाळासाहेब बेंडभर यांचा विजय झाला. तर महिला प्रतिनिधी प्रवर्गातून सरस्वती जगताप, कविता जगताप यांनी विजय मिळवला त्याचबरोबर इतर मागास प्रवर्गातून भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष आणि पंचायत समितीचे माजी सदस्य भगवान शेळके आणि बबन भुजबळ यांच्यात लढत झाली यामध्ये भुजबळ यांनी विजय खेचून आणला आणि शेळके यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून माजी उपसरपंच अशोक नाईकनवरे यांचे वडील तर विद्यमान सरपंच सोनल नाईकनवरे यांचे सासरे विष्णु नाईकनवरे पराभूत झाले आणि संभाजी नाईकनवरे यांनी विजय मिळविला. त्याचबरोबर भटक्या विमुक्त जाती जमातीमधून सुंदरलाल दौंडकर यांची अगोदरच बिनविरोध निवड झाली होती.
दरम्यान विजयी पॅनेलचे नेतृत्व संदीप जगताप, दत्तोबा तांबे, गजानन सोंडेकर, दत्तोबा थिटे, ऋषी थिटे, विश्वास जगताप, अशोक वाडेकर, गणेश शेळके, राजू तांबे, प्रदीप बेंडभर, मोहन टाकळकर, मोहन भुजबळ, धनंजय शितोळे, शैलेश जगताप, जालिंदर जगताप, दीपक जगताप, अरुण जगताप, शिवाजी बा. जगताप, आण्णा टाकळकर, उमेश जगताप यांनी केले होते तर पराभूत पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच शिवाजी जगताप, दीपक बेंडभर, पंडित थिटे, निलेश जगताप, शहजी तांबे, अशोक नाईकनवरे, यांनी केले होते.
Add Comment