शिरूर

यंदाचा शिरुर मल्लसम्राट ठरला ओंकार येलभर, तर महिला मल्लसम्राट कोमल शितोळे.

शिरूर, पुणे | कोरोना महामारीनंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा मोठ्या दिमाखात यंदा पार पडली.त्यानंतर गेले २० वर्ष सुरू असलेली शिरुर मल्लसम्राट कुस्ती स्पर्धा रांजणगाव गणपती येथे नुकतीच संपन्न झाली आणि या स्पर्धेत उपमहाराष्ट्र केसरी स्व.पै.संतोष येलभर यांच्या मुलाने म्हणजेच ओंकार येलभर याने यंदाचा शिरुर मल्लसम्राटच्या मानाची गदा खेचून आणली.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल आणि शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्या संकल्पनेतून २००३ पासून शिरुर तालुक्याच्या विविध गावात शिरुर मल्लसम्राट स्पर्धा पार पडत आहे.यंदा देखील रांजणगाव गणपती ( ता. शिरुर ) येथे शिरुर मल्लसम्राट २०२२ स्पर्धा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांनी आयोजित केली होती.त्यात ३५ किलो वजनगट ते खुल्या गटापर्यंतच्या पुरुष आणि महिलांच्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या.महिला शिरुर मल्लसम्राट म्हणून कोमल शितोळे हिने मान मिळवला,तर पुरुषांमध्ये ओंकार येलभर याने मान मिळवला आहे,तर उपविजेता आदित्य पवार ठरला.

दरम्यान जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचूंदकर आणि दत्तात्रय पाचूंदकर यांच्या माध्यमातून रांजणगावकरांना या कुस्ती स्पर्धांचा थरार अनुभवायला मिळाला आहे.बुलेट,स्प्लेंडर आणि स्कुटी गाडीसह रोख बक्षिसांचा वर्षाव यंदाच्या कुस्ती स्पर्धेत मल्लांना रांजणगाव गणपती ग्रामस्थांकडून देण्यात आला असल्याची माहिती शिरुर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झेंडू पवार आणि कानिफनाथ गव्हाणे यांनी सांगितले.

आदित्य पवार आणि ओंकार येलभर या दोघात चुरशीची लढाई पाहायला मिळाली.यामध्ये दोन्ही मल्ल तोडीस तोड असल्याने प्रेक्षकांच्या नजरा या कुस्तीकडे लागल्या होत्या.अखेर ओंकारने बाजी पलटवली आणि मानाची गदा, बुलेट गाडी आणि रोख बक्षिसे पटकावली.तर सिद्धी होळकर आणि कोमल पवार या दोघींमध्ये देखील काटे की टक्कर पाहायला मिळाली.सिद्धी कुस्ती जिंकणार असे वाटत असताना देखील कोमल पवार हिने शक्ती पेक्षा युक्तीचा वापर करत मानाची गदा, स्कुटी गाडी आणि रोख बक्षिसे पटकावली.

या स्पर्धेसाठी खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार निलेश लंके, माजी आमदार काकासाहेब पलांडे, केशरताई पवार, लेखक श्रीमंत कोकाटे, नाथाभाऊ शेवाळे, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, प्रदीप वळसे पाटील, देवदत्त निकम,सुभाष उमाप, शशिकांत दसगुडे, संदीप भोंडवे, आबासाहेब सोनवणे, दौलत शितोळे, राजेंद्र गावडे,शंकर जांभळकर, स्वप्नील ढमढेरे, स्वप्नील गायकवाड, बापूसाहेब शिंदे, राजेश लांडे, अमोल जगताप यांनी उपस्थिती लावली.

error: Copying content is not allowed!!!