आंबेगाव खेड जुन्नर राजकीय शिरूर हवेली

खासदार डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील संसदेत जाण्यासाठी आणखी एक पर्याय सुचवला..!

शिरूर, पुणे | शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे पुन्हा संसदेत जातील असे भाकीत शिवसेना नेते, संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी मंचर येथे केले होते. त्यानंतर महाविकास आघाडी मधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यातच आता विध्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील आढळराव पाटील यांना संसदेत जाण्यासाठी आणखी एक पर्याय सुचवला आहे.

दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी लांडेवाडी (मंचर) येथील आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी आढळराव पाटील संसदेत नाहीत याचं दुःख आम्हालाही आहे, त्यामुळे आगामी काळात आढळराव पाटील संसदेत जातील. इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल, मला आत्मविश्वास आहे पुढच्या वेळी नक्कीच आढळराव पाटील संसदेत जातील आणि संसदेत जाण्यासाठी खूप दरवाजे आहेत. या नाही तर त्या दरवाजातून जातील. असं संजय राऊत यांनी बोलल्यानंतर आढळराव पाटील हे राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार अशा चर्चांना उधाण आले.

दरम्यान याबाबत पत्रकारांनी डॉ. अमोल कोल्हे यांना विचारले असता त्यांनी मात्र संजय राऊत यांच्यावरच निशाणा साधला आणि लोकप्रतिनिधी हा कोणता नेता ठरवत नसतो तर जनता आपला लोकप्रतिनिधी ठरवत असते असे सांगितले. त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करावे लागते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे जर पुनर्वसन होणार असेल तर मी नक्कीच स्वागत करतो, यासाठी अनेक मार्ग आहेत. माजी खासदार म्हणून आढळराव पाटील संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये येऊ शकतात, ते राज्यसभेवर देखील जाऊ शकतात एवढच काय तर आढळराव पाटील अन्य कोणत्याही मतदार संघातून निवडून येऊ शकतात अशा प्रकारचा आणखी एक नवीन पर्याय डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना संसदेत जाण्यासाठी सुचविला आहे.

error: Copying content is not allowed!!!