शिरूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद
रांजणगाव गणपती, पुणे | राष्ट्रवादीच्या अन्यायाविरुद्ध भाजप बोलणार नाही असं राष्ट्रवादीला वाटत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. राष्ट्रवादीच्या दादागिरीची पायली भरली आहे, ठोशास ठोश्याने उत्तर देऊ. असे विधान माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी रांजणगाव गणपती येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले आहे.
दरम्यान रांजणगाव गणपती येथील माजी आमदार बाबुराव दौंडकर स्मारक समितीला माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी भेट दिल. यावेळी स्मारक समितीचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याची खंत बोंडे यांनी व्यक्त केली. दिवंगत आमदार बाबुराव दौंडकर यांना शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण होती, त्यांना अपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी प्रशिक्षण केंद्र’ याठिकाणी उभारावे हीच खरी बाबूराव दौंडकर यांना श्रद्धांजली ठरेल असे मत बोंडे यांनी व्यक्त केले.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब खळदकर यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत चिंता व्यक्त करत राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार मनमानी कारभार करत आहेत, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दादागिरी करतात शिवाय कारखान्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे सांगत तक्रारींचा पाढा वाचला. त्यावर बोलताना माजी मंत्री अनिल बोंडे यांनी आगामी काळात होणाऱ्या कारखान्याच्या निवडणुकीबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचबरोबर चर्चा करून स्थानिक आमदारांची दादागिरी मोडीत काढू. भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचार विरहित कशा प्रकारे कारभार करू शकते ते दाखवून देऊ. राष्ट्रवादीच्या अन्यायाविरुद्ध भाजप बोलणार नाही असं राष्ट्रवादीला वाटत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. राष्ट्रवादीच्या दादागिरीची पायली भरली आहे, ठोशास ठोश्याने उत्तर देऊ. असा इशारा माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना दिला आहे.
यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस पुणे धर्मेंद्र खांडरे , शिरूर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, किसान मोर्चा शिरूर तालुका अध्यक्ष काकासाहेब खळदकर, घोडगंगाचे माजी संचालक कैलास सोनवणे, संदीप शिंदे, डॉ. राजेंद्र ढमढेरे, रवींद्र दोरगे, उमेश पाचुंदकर, हर्षद जाधव, उमेश शेळके, केशव पाचरणे, निलेश गायके, नवनाथ आढाव, विठ्ठल वाघ, हर्षद ओस्तवाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Add Comment