
शिरुर, पुणे | टाकळी हाजी ग्रामपंचायतचा निकाल संपूर्ण हाती आला आहे, यामध्ये माजी आमदार पोपटराव गावडे आणि माजी सरपंच दामू घोडे यांच्या गटात लढत पहायला मिळाली. माजी आमदार गावडे यांनी घरोघरी जाऊन प्रचार करत मतदान मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती मात्र मतदारांनी सपशेल दामू घोडे यांच्या गटाला बहुमत देत एकहाती सत्ता स्वाधीन केली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायत निवडणुकीला अत्यंत महत्व प्राप्त झाले होते.
दरम्यान एकूण १७ जागांपैकी तब्बल १६ जागा दामू घोडे यांच्या गटाच्या विजयी झाल्या तर केवळ १ जागेवर माजी आमदार गावडे गटाला समाधान मानावे लागले आहे.
विजयी उमेदवारांची यादी :
वार्ड १ मधील विजयी उमेदवार – अशोक गावडे, पारुबाई माळी, अरुणा घोडे.
वार्ड २ मधील विजयी उमेदवार – गोविंद गावडे, अनिता जाधव, मनीषा घोडे.
वार्ड ३ मधील विजयी उमेदवार – नानासाहेब साबळे, विलास साबळे, प्रियांका बारहाते
वार्ड ४ मधील विजयी उमेदवार – दामू घोडे, अरूणा कांदळकर, पुष्पाबाई थोरात.
वार्ड ५ मधील विजयी उमेदवार – अर्जुन खामकर, भरत खामकर, प्रियांका दिवेकर.
वार्ड ६ मधील विजयी उमेदवार – मोहन चोरे, प्रमिला चोरे.
Add Comment