Uncategorized

घोडगंगाच्या सर्वसाधारण सभेचा घेतला विरोधकांनी ताबा.


चेअरमन पवारांच्या विरोधात घोषणाबाजी, सभा उधळली.

न्हावरे, पुणे | घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.२९) रोजी न्हावरे येथील घोडगंगा कारखान्याच्या आवारात आयोजित करण्यात आली होती. या सभेत सभेचे अध्यक्ष चेअरमन अशोक पवार प्रस्तावना करत असताना विरोधकांनी पवारांना थांबवलं आणि अध्यक्षीय भाषण सर्वात शेवटी करा तूर्तास सभासदांच्या प्रशांची उत्तरे द्या असे सांगत विरोधकांनी गोंधळ घालून सभेचा ताबा मिळवला.

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. या गोंधळात विषय पत्रिकेवरील सर्व विषय सत्ताधाऱ्यांकडू मंजूर करण्यात आले त्याला विरोधकांनी तीव्र विरोध नोंदविला. दरम्यान गोंधळ झाल्यानंतर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी माईकवर ताबा मिळवत फराटे यांच्याच अध्यक्षतेखाली प्रतिसभा घेण्यात आली. यावेळी कारखाना तोट्यात जातोय, कारखान्याची प्रत घसरली आहे, एफआरपी देण्यासाठी देखील पैसे उरले नाही, पूर्व हंगामी कर्जतील ५५ कोटी पैकीं २१ कोटी एफआरपी साठी वापरले ही बाब चुकीची आणि बेकायदेशीर आहे, कारखान्याचे प्रचंड नुकसान सभासदांच्या लक्षात आले आहे, कारखान्याची ५ एकर जमीन खाजगी संस्थेसाठी हडप केली त्यामुळे सभासद नाराज आहे. निवडणुकीत सभासद सत्ताधाऱ्यांना घरी बसवतील अशी अपेक्षा फराटे यांनी बोलताना व्यक्त केली.

यावेळी विरोधकांनी आक्रमक होत चेअरमन अशोक पवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या, सभास्थळी “अशोक पवार चोर है” या दिलेल्या घोषणा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेअरमन अशोक पवार हे या भागाचे आमदार आहेत अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन घोषणा देणे चुकीचे आहे, त्याचबरोबर कारखान्याचे सभासद नसणारे लोकं देखील या सभेत गोंधळ घालण्यासाठी आणले होते, दरम्यान भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी कारखान्याचे सभासद नसतानाही माईक ताब्यात घेतला यावर सत्ताधारी गटाने आक्षेप नोंदविला आहे. दरम्यान सभास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला, राज्य राखीव दलाची तुकडी देखील पाचारण करण्यात आली होती. त्यामुळे सभास्थळाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

दरम्यान दादा पाटील फराटे, पांडुरंग थोरात, सुरेश पलांडे, सुधीर फराटे, महेश ढमढेरे काकासाहेब खळदकर, राहुल पाचर्णे, राहुल गवारे, सचिन शेलार कैलास सोनवणे यांसह अनेकांनी सभास्थळी आक्रमक पवित्रा घेतला. तर माजी आमदार पोपटराव गावडे, मानसिंग पाचूंदकर, विश्वास कोहकडे, विश्वास ढमढेरे, राजेंद्र जगदाळे, राजेंद्र नरवडे, वसंत कोरेकर यांसह अनेकजण उपस्थित होते.

error: Copying content is not allowed!!!