Uncategorized

दौलत शितोळेंना मोठं करण्याची जबाबदारी आता भाजपने घेतली आहे – प्रविण दरेकर

शिरुर, पुणे | जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी शिरुर येथे नुकतीच उमजीराजे नाईक यांची २३१ वी जयंती साजरी केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधानपरिषदचे माजी विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर आवर्जून उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी शितोळे यांना भारतीय जनता पक्षाने ताकद देण्याचे ठरविले असल्याचे मत व्यक्त केले.

“आता राज्यात सरकार आपलं आहे, राज्य आपलं आहे, यापूर्वी दौलत नांनावर खोटे गुन्हे दाखल केले असतील, परंतु आता आपण जशास तसे उत्तर देऊ, नानांना त्रास देणाऱ्या औलादींना ठेचुन काढू, नानांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित राहतात, प्रदेशाध्यक्ष देखील आवर्जून उपस्थित राहतात. म्हणजेच भारतीय जनता पक्षाने आता यापुढे दौलत नाना शितोळेंच्या मागे ताकद उभी करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येत्या काळात रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या सर्व मागण्या मान्य होतील असे मत प्रविण दरेकर यांनी शिरुर येथील कार्यक्रमात व्यक्त केले. त्याचबरोबर गेल्यावर्षी दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून देत माझ्या वक्तव्यामुळे प्रस्थापितांच्या बुडाला आग लागली आणि माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे स्पष्टीकरण देखील यावेळी दरेकर यांनी दिले.

दरम्यान राज्यात आमच्या समाजाचा एकही लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे आमच्या ‘जय मल्हार क्रांती संघटनेला’ भाजप बरोबर सामावून घेत सत्तेत सहभागी करून घ्यावे. आगामी काळात आमचा पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य होईल यासाठी ताकद द्यावी असे मत दौलत शितोळे यांनी व्यक्त केले. त्यावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच त्याच्या हालचाली सुरू होतील. एकदा देवेंद्रजींनी शब्द दिला म्हणजे तो पूर्ण होणार असल्याचे देखील मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.

Featured

error: Copying content is not allowed!!!