शिरुर, पुणे | घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. २९ सप्टेंबर) रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने विरोधकांनी कारखान्याचे चेअरमन अशोक पवार यांना कोंडीत पकडण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यात मंगळवारी (दि. २७) रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिरुर येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अधोगतीला चेअरमन अशोक पवार जबाबदार असल्याचे अधोरेखित केले, ते म्हणाले की ‘मी त्यावेळी ऊर्जामंत्री होतो अनेक राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या कारखान्यांनी कोजनचे करार वेळेत केले. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन होती, मात्र अशोक पवारांनी याला उशीर केला आणि त्याचं खापर तत्कालीन सरकारवर फोडत आहेत’.
दरम्यान घोडगंगा सहकारी साखर कारखाना कर्जात आहे. गेले २५ वर्षे कारखान्याची सूत्रे अशोक पवार यांच्याकडे आहे, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाना कर्जात असल्याचे आरोप सातत्याने विरोधी गटाकडून केला जात आहे. त्याला प्रतिउत्तर म्हणून कोजनचा वीज खरेदी करार तत्कालीन भाजप सरकारने लवकर केला नसल्याने कारखान्याला नुकसान सहन करावं लागत आहे. असे मत चेअरमन अशोक पवार नेहमी मांडत असतात मात्र आज तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाच पत्रकारांनी विचारले असता बावनकुळे यांनी अशोक पवार यांचा समाचार घेतला.
ऑनलाइन प्रक्रिया सुरू असताना कारखान्याच्या तांत्रीक बाबींमुळे अशोक पवारांनी वेळेवर अर्ज केला नाही, त्यांनी घोडगंगा कारखान्यासाठी घाई का केली नाही, तुम्ही एकतर वेळेवर येणार नाही, जेव्हा वेळ निघून गेली तेव्हा तुम्ही दोष देता हा केवळ आणि केवळ त्याकाळात दुर्लक्षपणा केला आहे. सर्व कारखान्याला आम्ही. मदत केली. आम्ही खुली ऑनलाइन प्रक्रिया सुरू ठेवली होती तुम्ही वेळेवर आला नाहीत ही चूक तुमची म्हणजेच अशोक पवार यांची चूक आहे असा घणाघात तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
Add Comment