खेड,पुणे | हिंदुत्व आणि डॉ. अमोल कोल्हे यांचा काहीही संबंध नाही, राष्ट्रवादी कॉग्रेसचा हा भेगडीपणा आहे. हिंदुधर्माचे नाव घेण्याचा कोल्हेंना आधिकार नसल्याचा घणाघात शिरुरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राजगुरुनगर येथील पत्रकार परिषदेत केला आहे. त्याला तात्काळ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील प्रतिउत्तर देत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा गेल्या पंधरा वर्षांत विकास का झाला नाही ? असा सवाल करत, ज्यांना सद्याच्या परिस्थितीत कोणाच्या बाजूने बोलायचं हे समजत नाही त्यांच्या टीकेला मी उत्तर देऊ इच्छित नसल्याचे प्रतिउत्तर खासदार डॉ. कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना पुढे म्हणाले की, एखाद्या धर्माला खुष करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका दाखवली, आता ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाच्या आडुन हिंदुत्व दाखविण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे करत आहेत. तुमच्या ऐवढे आम्ही विद्वान नसलो तरी प्रेक्षक म्हणुन आम्हाला बुद्धी आहेच. हिंदुत्वाच्या आडून चालेला नौटंकीपणा सर्वच पक्षाला आणि जनतेला माहिती आहे. तुम्ही कोणालाही खुष करण्याचा प्रयत्न करुन आणाभाका घेतल्या तरी तुमची गोडसे आणि औरंगजेबाची भुमिका यातुन तुमच्या दुटप्पीपणाच्या भुमिका समोर आल्या आहेत त्यामुळे कोल्हेंच्या तोंडुन हिंदुत्व शोभत नसल्याचा गंभीर आरोप माजी खासदार आढळराव पाटल यांनी केला आहे त्यावर डॉ. कोल्हे यांनी देखील प्रतिउत्तर दिल्याने आजी आणि माजी खासदारांची हिंदुत्वाच्या मुद्यांवर चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे.
Add Comment