खेड, पुणे | खेडचे शिवसेना उपतालुका प्रमुख विष्णूदास उर्फ बाप्पूसाहेब थिटे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झालेले बाप्पूसाहेब थिटे यांनी शिवसेना पक्षात होणाऱ्या घुसमटमुळे भाजपात प्रवेश केला असल्याचे सांगितले.
गेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीत शिवसेनेकडून पत्नीला पंचायत समितीची उमेदवारी नाकारल्यापासूनच थिटे शिवसेना पक्षात नाराज होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे थिटे यांनी सांगितले. येत्या आठवड्यात रेटवडी – पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील अनेक शिवसैनिक भाजपात प्रवेश करणार असल्याचेही बाप्पूसाहेब थिटे यांनी सांगितले.
यापूर्वी शिरोमणी प्रतिष्ठाण, बजरंग दल या संघटनेच्या माध्यमातून युवकांचे संघटन करून माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली थिटे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. शिवसेना पक्षामध्ये दोन गट तयार झाल्यामुळे थिटे यांनी भाजपला पसंती देत. जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
Add Comment