ताज्या घडामोडी पुणे राजकीय शिरूर

मंगलदास बांदलांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवार ठरविला..!

शिरुर, पुणे | शिरुर तालुक्याच्या राजकारणात बड्या बड्यांची धांदल उडवणारे मंगलदास बांदल आता शिरुर तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद गटात आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा यापूर्वीच पत्रकार परिषदेत त्यांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच बांदल यांनी एका सहकाऱ्याची उमेदवारीच जाहीर केली आहे.

नुकतीच ‘शिरुर मल्लसाम्राट’ कुस्ती स्पर्धा पार पडली या स्पर्धेत अण्णापुरच्या आदित्य पवार या खेळाडूने ‘शिरुर मल्लसाम्राट’ हा किताब मिळविला त्याचा सन्मान अण्णापुर ग्रामस्थांनी आयोजित केला होता. यावेळी पैलवान मंगलदास बांदल बोलत होते. यावेळी बांदल यांनी या ‘शिरुर मल्लसाम्राट’ कुस्ती स्पर्धांसाठी योगदान देणाऱ्या रामभाऊ सासवडे यांचे कौतुक केले, त्याचबरोबर सासवडे यांना यावेळी स्वतः जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरावे अशा सूचना देखील केल्या. रामभाऊ सासवडे यांनी यापूर्वी शिक्रापूर गावचे सरपंच पद सांभाळले आहे, त्याचबरोबर शिरुर बाजार समितीचे संचालक म्हणून देखील त्यांनी तालुक्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवला आहे. मंगलदास बांदल यांच्या नेतृत्वाखाली रामभाऊ सासवडे यांनी अनेक निवडणुका जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात मंगलदास बांदल यांचा जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून रामभाऊ सासवडे पाहायला मिळतील.

रामभाऊ सासवडे हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सासवडेंच्या उमेदवारी बाबत बोलत असताना बांदल यांनी त्यांच्याप्रमाणे वेळप्रसंगी गट बदलून निवडणूक लढविण्याचा सल्ला देखील यावेळी दिला. त्यामुळे सासवडे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतील. परंतु कोणत्या गटात ते निवडणूक वाढवितात हे अद्यप ठरलेले नाही. त्यांचा बांदल यांच्या प्रमाणेच होमग्राऊंड जरी असलेला शिक्रापूर जिल्हा परिषद गट असला तरी गट बदलून निवडणूक लढविण्याची वेळ आली तर कोणत्या गटाची ते निवड करतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

error: Copying content is not allowed!!!