Uncategorized शिरूर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर तालुक्यात विविध उपक्रम

रांजणगाव गणपती | वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन कार्यक्रम दिनांक १५ जून २०२३ रोजी रांजणगाव गणपती येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभुषण अण्णासाहेब हजारे यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत तर्फे गावांमध्ये वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंचायत समिती गटविकास अधिकारी महेश डोके व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी एकूण 50 झाडांची लागवड करण्यात आली. तसेच शिरूर तालुक्यातील ५० हून अधिक गावांत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यामध्ये शेकडो कंपन्या वस्तू व सेवांचे उत्पादन करतात या कंपन्यांमध्ये हवा, पाणी, माती, आवाज यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. यामुळे शिरूर तालुक्यातील पशु, पक्षी ,वृक्ष, जीव, जंतू या सर्वांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. औद्योगिकीकरणा अगोदर पेक्षा औद्योगिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर तंबाखू युक्त पदार्थांच्या उत्पादनामुळे, घातक कचरा उत्सर्जनामुळे कर्करोगाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकूणच पर्यावरणाचे शोषण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याने सभोवतालच्या परिसरात तापमान वाढीची समस्या समोर आली आहे. यातून उतराई होण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ८७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरूर विकास गटामध्ये पंचायत समिती, लागवड अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, कृषी विभाग अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनाचे काम सर्व ग्रामपंचायतींनी हाती घेतले आहे. मोठ्या प्रमाणावर जंगली व फळांच्या वृक्षांची लागवड कार्यक्रम संपूर्ण महिनाभर करण्यात येणार आहे. यासाठी अनेक ग्रामपंचायतींनी रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशन (RIA)यांच्या विद्यमान अध्यक्षांकडे ट्रीगार्ड ,ठिबक, सोलर मोटर यांच्या मदतीची पत्राद्वारे आव्हान केले आहे. सदर लागवड केलेल्या वृक्षांच्या वर्षभर गवत काढणे, पाणी घालने यासाठी “बिहार पॅटर्न”( नरेगा ) काही सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. तरी वृक्षमित्र, पर्यावरण प्रेमींना आवाहन करण्यात येते की, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांनी दिली आहे. या कार्यक्रमाची रांजणगाव गणपती येथून करण्यात आली आहे. ग्रामपंचायत रांजणगाव गणपती व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व अण्णासाहेब हजारे यांचे अनुयायी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमात मान्यवरांनी भाग घेतला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर, सरपंच सर्जेराव खेडकर, ग्रामसेवक गंगाधर देशमुख, उपसरपंच संपत खेडकर,ग्रा. पं. सदस्य आकाश बत्ते, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर, डॉ. विकास शेळके, अण्णा हजारे यांचे अनुयायी तुषार कुटे, आशिष डहाळे, अमोल पाचुंदकर, सौरभ वाव्हळ, गणेश कदम, रामभाऊ खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Copying content is not allowed!!!