राजकीय शिरूर

राष्ट्रवादीच्या प्लॅनला भाजपचा सुरुंग.

शिरुर ख. विक्री संघ निवडणूक.

शिरुर, पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या शिरुर तालुका खरेदी विक्री संघ पुन्हा राष्ट्रवादीच्याच ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली होती. मात्र या फिल्डिंगला छेद देण्यासाठी भाजपने देखील रणनीती आखली आहे.

शिरुर तालुका खरेदी विक्री संघ पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्यासाठी आपल्या मर्जीतील मतदार असावेत यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी प्लॅन केला. मतदार यादी देखील जाहीर झाली. केवळ निवडणूक कार्यक्रम बाकी होता. या जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती. त्याआधीच भाजपचे तालुकाध्यक्ष आणि खरेदी विक्री संघाचे संचालक राहिलेले आबासाहेब सोनवणे यांनी राज्य शासनाकडे धाव घेतली आणि निवडणूक कार्यक्रमच पुढे ढकलण्यासाठी शासनाला पत्र लिहिले.

सोनवणे यांच्या पत्राचा आधार घेत जून महिना सुरू असून पावसाळ्यात शेतकऱ्यांची नव्याने पेरणीची कामे सुरू होणार असल्याने या कालावधीत शिरुर तालुका खरेदी विक्री संघ शिरुर या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास अनेक अडचणी उद्भवू शकतात. या खरेदी खरेदी विक्री सांघाची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावर
या शासनाच्या आदेशाच्या २३ जून या दिनांकापासून तीन महिन्याच्या कालावधीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती मात्र आता ही निवडणूक भाजपच्या रणनीतीमुळे पुढे ढकलली गेल्याने राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. आगामी काळात या निवडणुकीचे स्थगितीमुळे शिरुरच्या राजकारणात कसे पडसाद उमटले जातात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे

error: Copying content is not allowed!!!