करंदी, शिरुर | करंदी (ता. शिरुर) येथील विविध विकासकामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ त्याचबरोबर हळदी कुंकच्या कार्यक्रमाला महिलांचा उच्चांकी प्रतिसाद पाहून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समाधान व्यक्त करत “करंदीत या कार्यक्रमाला एवढी गर्दी पाहून मी भारावून गेलो आहे, ३५ वर्षांत मी काय केलं म्हणणाऱ्यांनी इथे येऊन पहावं” असा सल्ला दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांना करंदीत बोलताना दिला.
राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करंदीत विविध विकासकामांच्या भूमिपूजन, उद्घाटन प्रसंगी हजेरी लावली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाची जोरदार तयारी केली. यावेळी सहकार मंत्री पदाची संधी मिळाल्याबद्दल वळसे पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दरम्यान कार्यक्रमात करंदी ते धामारी रस्त्याचा प्रश्न महिला ग्रामस्थांनी प्रकर्षाने वळसे पाटील यांच्या समोर मांडला त्यावर बोलताना वळसे पाटील यांनी आदिवासी भागातील एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले की, जेव्हा मी पहिल्यांदा विधानसभा निवडणुक जिंकली आणि आदिवासी भागात गेलो त्या भागातील महिला अशाच प्रकारे माझ्याशी विकासकामांच्या मागणीसाठी मी त्यांच्या जवळचा म्हणून माझ्याशी भांडण करायच्या मी म्हणत असे की, “माझ्याशी तुमचं भांडण आहे तर मला मत देऊ नका” परंतु त्या म्हणायच्या की “मत आम्ही तुम्हालाच देणार आणि कामही करून घेणार”. तशाच प्रकारे तुमच्या या ८ किलोमीटररच्या रस्त्याचा प्रश्न अजितदादा किंवा मुख्यमंत्री यांच्याशी बोलून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करता येतो का ते पाहून घेतो. त्यावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
पूर्वा वळसेंच्या उमेदवारीचे अप्रत्यक्ष संकेत.
दरम्यान केंद्र सरकारने महिलांच्या लोकसभेतील राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणला आहे त्याचाच धागा पकडून वळसे पाटील यांनी उद्याच्या काळात देशाच्या लोकसभेत आणि राज्याच्या विधानसभेत आपल्यापैकी एखादी महिला भगिनी आमदार, खासदार दिसल्या तर नवल वाटायला नको. असे मत वळसे पाटील यांनी व्यक्त केले. त्यामुळे अप्रत्यक्ष या भागातून महिला प्रतिनिधी म्हणून उद्याच्या काळात पूर्वा वळसे पाटील असतील की काय अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीच्या रिंगणात पूर्व वळसे पाटील उमेदवार म्हणून पाहायला मिळाल्या तर नवल वाटायला नको.
बंटी ढोकलेंच्या भाषणाची चर्चा.
दरम्यान या कार्यक्रमात किरण (बंटी ) ढोकले बोलताना आपल्या भाषणात सांगितले की, आतापर्यंत राजकीय जीवनात ज्यांना आम्ही मदत केली त्यांनीच गावच्या राजकारणात कशा प्रकारे आमचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला, कशा प्रकारे राजकीय त्रास देण्याचा प्रयत्न केला याचा पाढाच बंटी ढोकले यांनी वाचला. पुढे ते म्हणाले की, साहेब ज्यांना तुम्ही मोठं केलं ते आता बाजूला गेले. जे काही केलं ते मीच केलं आणि करंदी गाव म्हणजे मीच. असं म्हणणाऱ्यांना आता घरी बसण्याची वेळ अली आहे. उद्विग्न होऊन ढोकले यांनी केलेल्या भाषणाची चर्चा यावेळी पाहायला मिळाली.
Add Comment