पुणे | पुणे जिल्ह्याचा शहरी भाग आणि ग्रामीण भाग चार लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ अर्थात संपूर्ण शहरी भाग तर मावळ मतदारसंघात पिंपरी चिंचवड शहर आणि काही ग्रामीण भाग आहे त्याचबरोबर इकडे शिरुर आणि बारामती मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाचा समावेश आहे. येऊ घातलेली २०२४ ची लोकसभा निवडणुक प्रक्रिया जाहीर झाली आहे.
महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडेल यामध्ये बारामती तिसऱ्या टप्प्यात तर मावळ, शिरुर, पुणे या मतदारसंघाचे मतदान चौथ्या टप्प्यात होणार आहे. यामध्ये क्रमांक ३६ शिरुर लोकसभेच्या उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे २५ एप्रिल २०२४ ही अखेरची तारीख असरणार आहे. अर्जाची छाननी २६ एप्रिल, अर्ज माघारी घेण्याची अखेरची तारीख ही २९ एप्रिल असणार आहे.
दरम्यान १३ मे रोजी शिरुर लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडेल तर मतमोजणी ही ४ जून रोजी होणार आहे. परंतु यावेळी प्रथमच शिरुर लोकसभेचा निकाल अर्थात मतमोजणी शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पार पडेल.
पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघाचे निकाल कोरेगाव पार्क, रांजणगाव एमआयडीसी आणि बालेवाडी स्टेडियम येथून बाहेर पडतील. या चारही लोकसभा मतदारसंघात
निवडणुकीची चुरस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर चारही मतदार संघात चार प्रमुख पक्षांचे प्रमुख चेहरे या निवडणुक प्रक्रियेत असणार आहे.
Add Comment