महाराष्ट्र राजकीय

अजितदादांनी नेतृत्व हेरलं, बंटी ढोकले राज्य कार्यकरणीवर.

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक आघाडी राज्य सरचिटणीस पदाची महत्वाची जबाबदारी देऊन करंदी (ता. शिरुर) येथील किरण उर्फ बंटी ढोकले यांना अजित पवारांनी पक्षाच्या राज्य कार्यकरणीवर काम करण्याची संधी दिली आहे. निवडीचे पत्र स्वतः अजित पवार यांनी मुंबई येथील पक्ष कार्यालयात दिले.

ढोकले यांनी यापूर्वी पक्ष संघटनेत तालुका आणि जिल्हा स्थरावर काम केलेले आहे. राष्ट्रवादी पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर स्थानिक आमदार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत पक्षात काम करण्याचा निर्णय किरण ढोकले यांनी घेतला, सोबतच्या अनेक सहकाऱ्यांना देखील दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षात सक्रिय राहण्यासाठी आग्रह केला.

दरम्यान करंदी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची ढोकले यांच्या पत्नी सोनाली ढोकले यांनी उत्तम जबाबदारी निभावली आहे. त्यानंतर सहकाऱ्यांसह करंदी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यास किरण ढोकले यांना यश मिळाले. गेल्या अनेक वर्षांपासून दिलीप वळसे पाटील यांच्यासोबतचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून परिसरात ढोकले यांची ओळख आहे. त्याचबरोबर इतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांशी ढोकले यांचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. जनसंपर्क दांडगा असल्याने वळसे पाटील यांच्या शिफारशीमुळे पक्षाच्या राज्य कार्यकरणीवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना गेल्या निवडणुकीपेक्षा गावातून अधिक मतदान मिळवून देण्यात ढोकले यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. या निवडीनंतर सर्व पक्षीय ग्रामस्थांनी किरण उर्फ बंटी ढोकले यांचे अभिनंदन करत जाहीर सत्कार केला.

पक्षाची ध्येय धोरणे, अजित दादांचे विचार आणि वळसे पाटील साहेबांची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी यापूर्वी देखील काम करत आलो आहे. त्याचबरोबर या पदाच्या माध्यमातून आणखी ऊर्जा मिळाली आहे. पक्षाशी प्रामाणिक राहण्याचे हे फळ आहे, तर यापूर्वी पक्षाची जबाबदारी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला, यावेळी मात्र वळसे पाटील साहेब आणि अजितदादांनी स्वतःहून जबाबदारी सोपवली आहे. या संधीचं सोनं करणार असल्याचे मत The बातमीशी बोलताना किरण ढोकले यांनी व्यक्त केले. जबाबदारी स्वीकारताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, करंदीचे माजी उपसरपंच पांडुरंग ढोकले, उद्योजक प्रवीण ढोकले उपस्थित होते.

error: Copying content is not allowed!!!