पत्नी आणि भावालाही चौकशीला बोलावलं.
पुणे | शिरुर – हवेली मतदारसंघातील मोठं राजकीय व्यक्तिमत्त्व आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या दोन्ही निवासस्थानी २० ऑगस्ट रोजी ईडीने छापा टाकला त्यानंतर रात्री उशिरा ईडीने चौकशीसाठी मंगलदास बांदल यांना चौकशीसाठी मुंबईला नेलं काल (दि.२१) रोजी न्यायालयात हजर केले असता बांदल यांचा पुढचा आठवडाभराचा मुक्काम ईडीच्या कास्टडीत असणार आहे. दि.२९ रोजी पुन्हा न्यायालयात हजर करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहाराप्रकारणी मंगलदास बांदल यांना यापूर्वी देखील २१ महिने तुरुंगात काढावे लागले आहेत. या प्रकरणी ईडीने बांदल यांना ताब्यात घेतले आहे. याच प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा बांदल यांना देखील ईडीने चौकशीसाठी आज (दि. २२) रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर बांदल यांचे थोरले बंधू प्रताप बांदल यांना देखील चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे.
मंगलदास बांदल यांच्या घरी जेव्हा ईडीने छापा टाकला तेव्हा चौकशी दरम्यान ५ कोटी ६० लाख रुपयांची रोकड, आलिशान कार, एक कोटी रुपयांची मनगटी घड्याळे आढळून आली आहेत. मंगलदास बांदल हे आलिशान कार आणि महागड्या वस्तूंचे चाहते आहेत.
Add Comment