आंबेगाव शिरूर विधानसभेचे राजकारण पेटणार !
मंचर/आंबेगाव ( प्रमोद लांडे ) : “स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवून घेत आणि मग रांजणगाव सारख्या ठिकाणी पाच पाच एकर जमिनी कशा काय? ” असा सवाल उपस्थित करत शिरूर – आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांच्यावर सडेतोड टीका केली आहे.
आज मंचर येथे शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा युवक-युवती मेळावा पार पडला आहे. यावेळी मानसिंग पाचुंदकर यांनी देवदत्त निकम यांच्यावर जोरदार विरोधकांचा खरपूस असा समाचार घेतला आहे. ” विरोधकांनी आमच्या वर लाभार्थी म्हणून टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच खरे लाभार्थी कोण आहेत, तर जे बारा वर्ष भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन होते, जे सात वर्ष मार्केट कमिटीवर त्यांनी काम केलं. त्याचप्रमाणे साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये साहेब तुमच्या नावाने घोषणा दिल्या तर त्यात आमचे काय चुकले. आम्हाला गुंड म्हणून संबोधित केले गेले आहे.” असे यावेळी पाचुंदकर यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना सांगितले की, ‘पत्रकार परिषदेत निकम यांनी एक कागद दाखवला आणि त्या कागदावर तडीपारीची नोटीस होती.मात्र त्या नोटीसवर इतर नावे जी होती ती देखील निकम यांनी वाचायला पाहिजे होती. आम्ही मान्य करतो काही दिवस आमचे होते, ज्यावेळी आम्ही वळसे पाटील यांच्या साथीला आलो, तेव्हापासून वाल्याचा वाल्मिकी झाला आहे.’ असे प्रतिपादन मानसिंग पाचुंदकर यांनी केलं आहे.
निकम यांच्यावर जोरदार टीका करत पाचुंदकर यांनी मेळाव्यात पुढे बोलले की, शेतकरी पुत्र स्वतःला म्हणवून घेता, तर आज रांजणगाव सारख्या ठिकाणी पंचवीस लाख रुपये गुंठ्यांची पाच-पाच एकर जमिनी घेता कशा काय घेता येतात, असा सवाल मानसिंग पाचुंदकर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान रांजणगाव एमआयडीसी परिसरात जमिनींचे भाव गेल्या अनेक वर्षांपासून गगनाला भिडले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार देवदत्त निकम हे शेतकरी पुत्र म्हणून मतदार संघात आपली प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पाचुंदकर यांनी केलेल्या टीकेमुळे निकम यांचा खरं चेहरा समोर येतो की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आगामी काळात आंबेगावच राजकारण आणखी तापणार आहे.
मंचर येथील युवक युवती मेळाव्यात राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवती कार्याध्यक्षा व सरपंच निर्मला नवले, किरण वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील तसेच अजित पवार गटाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Add Comment