शिरूर : महायुतीत असणाऱ्या राष्ट्रवादी ( अजित पवार ) काँग्रेस अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून आज (२९ऑक्टों.) अर्ज दाखल केला आहे. तसेच बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुणे जिल्ह्याच्या सर्व मतदारसंघातून आमदार अजित पवारांसोबत गेले आहे. मात्र एकमेव शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आमदार पवार यांना पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी कटके यांना राष्ट्रवादीत प्रवेश करवून घेत उमेदवारी जाहीर केली असून आज ( २९ऑक्टों ) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचप्रमाणे भाजपचे नेते यांनी देखील आज बंडखोरी करून अर्ज दाखल केला आहे. कंद यांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता अर्ज भरल्याने कंद यांचं बंड येत्या ०४ तारखेला थंड होणार की, या बंडाची दाहकता अखेर पर्यंत अशीच राहणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार अशोक पवार यांच्या विरोधात महायुतीत असलेल्याच पदाधिकाऱ्यांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे युतीत एकजूट ठेऊन पवारांना शह देण्यासाठी उमेदवार एक की अनेक राहणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
Add Comment