रांजणगाव गणपती : ‘आयुष्यभराची देते साथ, बंध मैत्रीचे असतात खास, नाही झालं भेटणं जरी, होत नाही तरी मत्रीचा सहवास’ या उक्तीप्रमाणे आज ( दिनांक ०४ नोव्हेंबर, २०२४ ) रोजी मंगलमूर्ती विद्याधाम प्रश्नाला रांजणगाव गणपती याठिकाणी दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला आहे.
शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे होते. ‘बंध मैत्रीचे’ या शीर्षकाखाली सर्वच मित्र मैत्रिणींनी एकत्र येत पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामधील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगाव गणपती गावातील सन २००६-०७ ची बॅच मधील मित्र-मैत्रिणी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येऊन तब्बल १८ वर्षांनी एकत्र येण्याचे ठरले. या स्कुलची एस.एस.सी २००६-०७ बॅच रांजणगाव येथे स्नेह संमेलन रविवार ( दि. ०४ नोव्हेंबर २०२४ ) रोजी मोठ्या उत्साहात मेळावा पार पडला आहे. या स्नेह मेळाव्यासाठी तत्कालीन प्रशालेतील गुरूजनांनी देखील मोठी उपस्थिती दर्शविल्याने कार्यक्रम आणखी रंगतदार झाला आहे. गणेश वेताळ, मच्छिंद्र बनकर, रामदास शिंदे, दत्तात्रय भुजबळ, नंदकुमार अनारसे, सुनंदा भोगावडे, सुभाष पाचकर, सुनिल थोरात, वंदना रासकर, अशोक शेळके, संजय कर्डिले, तुकाराम फंड या सर्वच गुरूजनांनी हजेरी लावली होती.
मंगलमूर्ती विद्याधाम प्रशालेत स्नेह संमेलन मेळाव्याच्या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. तद्नंतर शिक्षकांचे सन्मान उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आला. सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साह मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे शिक्षकांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा देत आपली मनोगत मांडली आहे. ‘बंध मैत्री’ स्नेह मेळाव्याचे आयोजन विशेषतः निलेश गायखे, शेखर लांडे, योगेश पाचुंदकर , निलेश पाचुंदकर, तुषार कुटे, उमेशराज पाचुंदकर, सोमनाथ फंड आणि प्रमोद लांडे आणि सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनींनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली हरपळे यांनी केले.
Add Comment