क्राईम ताज्या घडामोडी राजकीय शिरूर हवेली

अपहरण, मारहाण अनं विवस्त्र ! आमदार पवारांच्या मुलाबाबत धक्कादायक प्रकार..!

शिरूर : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज अशोक पवार यांचे अपहरण करीत विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना धक्कादायक घडली आहे. यासंदर्भात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचे चिरंजीव व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज अशोक पवार यांच्यावर हनी ट्रॅप करून अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ऋषीराज पवार हे शिरूर तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या मांडवगण फराटा येथे प्रचारानिमित्त गेले असता काही लोकांनी अपहरण करून दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी विवस्त्र करून मारहाण केली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिरूर तालुक्यात घडलेल्या प्रकारामुळे तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच याबाबत पुण्यातील वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतः ऋषीराज पवार यांना थेट व्हिडिओ कॉल केला आणि झालेला प्रकार सांगितला आहे. मात्र शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी माहिती समोर येणार आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!