कारेगाव : जिल्हा परिषद कारेगाव आहे शाळेतील शिक्षकाने काही अल्पवयीन मुलींची छेडछाड आणि मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षक याला अटक करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल महादेव शेळके ( वय. ५२, रा. सोने सांगवी, ता. शिरूर, पुणे ) हा कारेगाव येथील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे. शाळेतील मुलींसोबत गैरवर्तन करणे, मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य अनिल शेळके हा शिक्षक करत होता. इयत्ता सहावी आणि सातवीच्या लहान मुलींसोबत असे कृत्य घडत असताना आरोपी शिक्षक शेळके यांनी मुलींना कोणालाही न सांगण्याची बाब केली होती. याबाबत विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यानंतर पालक, शाळेतील इतर शिक्षकांशी मुख्याध्यापकांशी व गावातील पदाधिकाऱ्यांची संपर्क साधून संबंधित शिक्षकाचा प्रताप कानावर घातल्यावर मुख्याध्यापक यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक शेळके यास अटक करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, गटविकास अधिकारी महेश डोके, गटशिक्षण अधिकारी कळमकर यांनी तत्परता दाखवून आरोपीस अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, पोलीस हवालदार अभिमान कोळेकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे व सहाय्यक फौजदार राजेंद्र कर्डिले यांच्या पथकानें केली.
Add Comment